सोलापूर — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक केंद्र शाळा बोंडले,वेळापूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जितेंद्र आव्हाड युवा मंच सोलापूरचे अध्यक्ष समद आतार, ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव पांडुरंग माने, बाबासाहेब गायकवाड, जब्बार आतार आनंद जाधव, ज्ञानेश्वर बिले पंकज जाधव, डॉ. हर्षद जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी समर आतार म्हणाले,जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता सामाजिक संदेश देणारा असावा या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड युवा मंच सोलापूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.