फलटण- फलटण येथील रविवार पेठेतील रेशनिंग चे दुकान रेशनिंग दुकानदार चालकाने महाराजा मंगल कार्यालयाच्या येथे स्थलांतरित केल्यामुळे रेशन आणण्यासाठी होणारा खर्च पाहता रविवार पेठेतील रेशनिंग ग्राहकांना चाऱ्या ण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी परिस्थिती सहन करावी लागत आहे अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांनी अन्न पुरवठा विभागाकडे केली आहे.
याबाबत रविवार पेठ येतील मोहन बजरंग पोतेकर यांनी अन्न पुरवठा विभाग, विभागीय आयुक्त पुणे, सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अहिल्या बचत गट या बचत गटा मार्फत हे रेशनिंग दुकान चालू असून ग्राहक रविवार पेठ येथील आहेत. दुकान चालकांनी कोणतीही कल्पना न देता महाराजा मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केले. यामुळे ग्राहकांना रविवार पेठ इथून एक किलोमीटर अंतर रिक्षाने जाऊन शासनाच्या वतीने मिळणारा रेशनिंगचा शिधा घेऊन यावा लागत आहे. तसेच हे रेशनिंग दुकान अन्नपुरवठा विभागाच्या नियमानुसार वेळेप्रमाणे चालू असत नाही, यामुळे ग्राहकांना रेशनिंग साठी दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात.
याबाबत रविवार पेठ येथील रेशनिंग ग्राहकांनी अन्नपुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दिनांक 5/4/ 2025 रोजी तक्रार दिलेली आहे परंतु याबाबत कोणतीही तक्रार ची दखल न घेतल्यामुळे ग्राहकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अहिल्या बचत गटाच्या वतीने येथील एका व्यापाऱ्याने अर्जदार मोहन बजरंग पोतेकर यांना दूरध्वनीवरून सांगितले की आपणच आम्हाला जागा उपलब्ध करून द्या आम्ही रेशनिंग दुकान इकडे आणतो अशी उलट उत्तरही अर्जदार यांना देण्यात आलेली आहेयाची त्वरित दखल घेऊन रेशनिंग ग्राहकांना होणारा त्रास थांबवण्यात यावा अशी विनंती बऱ्याचशा रेशनिंग ग्राहकांनी केली आहे.