स्थानिक

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ शाळेमध्ये रोगप्रतिकारक सत्राचे आयोजन

पुणे –  – भारतातील लोक मान्सूनची सर्वाधिक आतुरतेने वाट पाहतात, कारण तो कडक उन्हापासून दिलासा देतो आणि मनाला ताजगी देतो. मात्र, या ताजेतवाने हवामानासोबतच अनेक प्रकारच्या आजारांनाही तो आमंत्रण देतो. जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल, तर आपण सहज आजारांच्या विळख्यात सापडतो, विशेषतः लहान मुले यामुळे अधिक प्रभावित होतात. तापमानात घट आणि आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे मान्सूनमध्ये संसर्ग होणे सामान्य बाब आहे.

सामान्यतः मान्सूनमध्ये सर्दी-खोकला, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड आणि न्यूमोनिया यांसारखे आजार वाढतात. उष्ण, दमट हवामानामुळे विविध प्रकारचे संसर्ग होतात आणि जर प्रतिकारशक्ती कमी असेल, तर ते वेगाने पसरतात. डाबर च्यवनप्राशच्या पुढाकाराने नुकताच एक कार्यक्रम बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ शाळेमध्ये पार पडला, या कार्यक्रमाला दिनेश कुमार डाबर इंडिया लिमिटेड, प्रभारी मुख्याध्यापक सौ. सुनिता जाधव नितीन वाणी सर,सौ.संजीवनी सोनार, प्रदीप गवळी, श्रीम.स्वाती लोहकरे,सौ.सुरेखा डफळ,सेविका सौ.पूजा घोगरे, अजय कोंढावळे, तुषार तमनर,रोहित सिरस्वाल, कल्याणी गाडे शाळा क्रमांक 118 मुलांची विश्रांतवाडी चे सर्व कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.

शतकानुशतके चालत आलेल्या आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रावर आधारित योग्य प्रमाणात घेतलेली औषधी मानसूनमधील रोगजंतूंशी लढण्यास उपयुक्त ठरते. अ‍ॅलोपॅथी शास्त्र आजार बरे करण्यावर लक्ष केंद्रित करते, तर भारतीय पारंपरिक औषधी आणि आयुर्वेद जीवनशैली अधिक आरोग्यदायी आणि ऊर्जावान बनवण्यासाठी मदत करतात.

‘रसायन तंत्र’ हा आयुर्वेदातील आठ शाखांपैकी एक असून, नवचैतन्य निर्माण करणारे उपाय, आहार नियम आणि आरोग्यवर्धक सवयी यांचे वर्णन त्यामध्ये केलेले आहे. दररोज दोन चमचे डाबर च्यवनप्राश घेणे, हे आपल्या आहारात रसायन तंत्र समाविष्ट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

डॉ. परमेश्वर अरोरा (एम.डी., आयुर्वेद, बी.एच.यू.) यांनी सांगितले की, “च्यवनप्राश हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक सूत्र आहे, ज्याचा वापर अनेक दशकांपासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गापासून संरक्षणासाठी केला जात आहे. डाबर च्यवनप्राश हा त्याच पारंपरिक सूत्रावर आधारित असून त्यात अनेक औषधी वनस्पती आणि खनिज घटकांचा समावेश आहे. डाबर च्यवनप्राश विविध आजारांच्या प्रतिबंधात उपयुक्त ठरतो कारण त्याचे रोगप्रतिकारक परिणाम सिद्ध झाले आहेत. डाबरने विविध क्लिनिकल आणि प्री-क्लिनिकल अभ्यास केले असून, ते प्रतिकारशक्ती वाढवणे, ऋतूजन्य परिणाम, नाकाच्या अ‍ॅलर्जी आणि संसर्ग यावर प्रभावी असल्याचे दर्शवतात. च्यवनप्राश ‘वात-पित्त-कफ’ या त्रिदोषांना संतुलित करण्यास मदत करतो. डाबर च्यवनप्राश रोगजंतूंशी लढणाऱ्या डेंड्रिटिक सेल्स, एन.के. सेल्स आणि मॅक्रोफेज यांना सक्रिय करण्यात मदत करतो.”

डाबर इंडिया लिमिटेडचे हेल्थ सप्लिमेंट्सचे मार्केटिंग हेड श्री प्रशांत अग्रवाल म्हणाले, “आयुर्वेदाची समृद्ध परंपरा आणि निसर्गाच्या ज्ञानासह डाबरने नेहमीच अभ्यासाधारित, सुरक्षित, परवडणारी आणि प्रभावी आरोग्यसेवा देण्यावर भर दिला आहे. आम्ही आमच्या उत्पादनांद्वारे भारतात विविध आजारांशी लढण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात लोक नैसर्गिक गुणधर्मांमुळे वनस्पती आणि हर्बल अर्कांना अधिक पसंती देतात. डाबर च्यवनप्राश हे प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचे संयोजन आहे. हे उत्पादन दररोज होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षणासाठी एक आदर्श मार्ग आहे.”

डाबर च्यवनप्राशमधील प्रमुख घटक ‘आवळा’ आहे, जो प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय गिलोय (गुदुची), पिप्पली, कांटाकरी, काकदशिंगी, भूम्यामलकी, वासा, पुष्करमूल, प्रिष्णीपर्णी, शालपर्णी आदी घटक सामान्य संसर्ग आणि श्वसनाशी संबंधित अ‍ॅलर्जी कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे च्यवनप्राश हे अनेक औषधी वनस्पतींचे संतुलित मिश्रण असून, विशेषतः मान्सूनच्या दिवसांत शरीराला उत्तम प्रतिकारशक्ती देऊन आरोग्य उत्तम राखतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button