पुणे ~,:प्रत्येक वर्षी ४ ऑगस्ट् रोजी ‘राष्ट्रीय अस्थिरोग दिन’ (National Bone & Joint Day) संपूर्ण देशभर साजरा केला जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून भारतीय अस्थिरोग संघटना ३ ऑगस्ट् ते १० ऑगस्ट् २०२५ हा सप्ताह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी विविध उपक्रमांनी भरलेला ‘हाडसंपन्न सप्ताह’ म्हणून साजरा करणार आहे.
ही संकल्पना IOA चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित शिंदे आणि डॉ. अनुप अग्रवाल यांनी दिली असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालीक्षमता (Mobility), स्वाभिमान (Dignity) आणि दीर्घायुष्य (Longevity) यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र अस्थिरोग संघटना (MOA) ह्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्य अध्यक्ष डॉ. डुमरे पाटील, सचिव डॉ. अभिजित वाहेगावकर आणि संपूर्ण कार्यकारिणी सक्रिय सहभाग घेणार आहे.
डॉ. प्रकाश सिगेदार यांची या राज्यस्तरीय कार्यक्रमांसाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार पडतील. कार्यक्रमांचा उद्देशः
हाडे व सांधे ह्यांच्या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधणे
ज्येष्ठ नागरिकांना समर्पित आरोग्यसेवा आणि सन्मान
सामाजिक स्वास्थ्य, नैतिक जबाबदारी आणि डॉक्टरांची समाजाशी बांधिलकी अधोरेखित करणे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे अमूल्य रत्त आहेत. त्यांचे आरोग्य टिकवणे ही केवळ वैद्यकीय गरज नाही,
तर सामाजिक बांधिलकी आहे. “ओल्ड इज गोल्ड” या घोषवाक्याच्या छायेखाली राबवले जाणारे हे सप्ताहव्यापी उपक्रम निश्चितच समाजाला हाडांच्या आणि माणुसकीच्या आधाराने अधिक बळकट करतील. आपणही या उपक्रमात सहभाग नोंदवून आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठांचे आरोग्स आणि सन्मान सुरक्षित करण्यास पुढे या!