फलटण – बहुचर्चित फलटण ते बारामती या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत चालले असून सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.निकृष्ट कामाची चौकशी होऊन ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी वाहनधारकाकडून होत आहे.तक्रार करायला गेल्यास ठेकेदार बारामतीच्या दादा लोकांची नावे घेत दबाव टाकत असल्याने प्रशासन पण हतबल झाले आहे.

फलटण – बारामती महामार्गावरील सुरू क्रॉंक्रीटीकरण जागोजागी खराब झाले आहे कित्येक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत.त्या ठिकाणी नुकत्याच एका मोटरसायल स्वराचा अपघात झाला असून,या भेगांमुळे अनेक छोटे मोठे दररोज अपघात घडत आहेत.कित्येक ठिकाणी रस्ता खचू लागला आहे.
यावरूनच फलटण बारामती महामार्गाचे ठेकेदाराच्या गलथान कारभाराचे चित्र प्रत्येक प्रवाश्यांना रस्त्यावरून प्रवास करताना दिसत आहे. या निष्कृष्ठ कामाबद्दल अनेकजण सपशेल नाराजी व्यक्त करीत आहेत, परंतु संबंधित ठेकेदाला काहीही फरक पडल्याचे दिसत नाही. या संबंधित आडमुठ्या ठेकेदारावर ‘दादा’ चा का “साहेबाचा”वरदहस्त आहे? याबाबत प्रवाश्यांमधुन बोलले जात आहे.
फलटण – बारामती रस्त्याच्या सिमेंट काॅक्रीटी करणाला मुर्त स्वरुप प्राप्त झाले असले तरी ठेकेदाराच्या गलथान कारभारमुळे फलटण – बारामती महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरण हे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन काम पुर्ण होण्याअधीच महामार्गावरील रस्त्यावर खड्डे पडू रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा मोठ्या पडल्या आहेत. यामुळे रस्ता खचू लागला आहे.यावरुनच संबंधित विभागाच्या कामकाजाचे चित्र स्पष्ठपणे दिसत आहे.
सदर ठेकेदारास सुनावले तरी ठेकेदारास कोणताही फरक पडत नसल्याने ‘येरे माझ्या मागल्या’ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे फलटण व बारामती परिसरातुन बोलले जात आहे.
या महामार्गावर कित्येक ठिकाणी बारामती हून निघाल्यानंतर फलटण येई पर्यंत प्रत्येक प्रवाश्यास असंख्य खड्डे दिसू लागले आहेत. तसेच कित्येक ठिकाणचे रस्तेही खचू लागले आहेत. कित्येक ठिकाणी रस्त्यावरील खडी उचकटू लागल्याचेही दिसत आहे. सदर रस्त्याचे सबंधित विभागाने सूक्ष्म परीक्षण केल्यास सर्व बाबी स्पष्ट होतील व वास्तव समोर येईल.परंतु राजकारणी व अधिकारी मॅनेज असल्याची चर्चा सुरू झाली आहे,डांबरीकरण करण्यास प्रति किलोमीटर अंदाजे ७५ ते ८० लाख रुपये खर्च येतो. काँक्रीटी करण्यासाठी प्रति किलोमीटर अंदाजे १ ते १.५ कोटी खर्च येतो. मात्र सिमेंटचे रस्ते हे २० ते ३० वर्षे टिकतात यामुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च टाळता येतो.हा उद्देश समोर ठेवून सरकारने सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्याकडे भर दिला आहे. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते हे अधिक मजबूत व टिकाऊ असतात. यामुळेच संपुर्ण देशात सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे करण्याचा वेग वाढू लागला आहे.
फलटण -बारामती महामार्गाच्या सिमेंट क्रॅाक्रीटी करणाचे काम हे सोमंथळी ता.फलटण येथे पोलिसी खाक्या दाखवुन करुन घेतले आहे एकीकडे काम सुरू असून दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यावरून फलटण बारामती महामार्गाच्या एकूण कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामांची कोणत्या अक्षरात नोंद घ्यावी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
” सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे दिसत असतानाही फलटण आणि बारामतीचे प्रशासन काहीच कारवाई ठेकेदारावर करत नाही.दादा नेतेमंडळींना ते भीत आहेत की आर्थिक तडजोडीतून ते गप्प बसत आहेत का तसेच नेतेमंडळीसुद्धा का लक्ष देत नाहीत असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.”
Back to top button
