फलटण – कोळकी ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अनियमित कामे सुरू असून भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ताधारी मंडळी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहोत ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी सरपंच रेश्मा देशमुख आणि माजी उपसरपंच विकास नाळे यांनी केली आहेत.
कोळकी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी मंडळींनी ज्या पद्धतीने गावाच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे . सरपंच , उपसरपंच यांच्या मनमानी कारभारला व त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही ग्रामपचायत सदस्यानी माजी.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गावातील मूलभूत प्रश्नासाठी व जनतेला सुख सुविधा मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने ग्रामपंचायत मध्ये काही गोष्टींची मागणी करत आहे परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी मंडळी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.
गावामध्ये अनेक ठिकाणी अनियमित कामे सुरू असून काही ठिकाणी मुरुमाची गरज नसताना मुरूम टाकला जातो व त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. अनेक चुकीच्या पद्धतीची कामे गावामध्ये सुरू आहेत त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांना घेऊन लवकरच या भ्रष्टाचाराबाबत माजी. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी मागणी करणार आहे व दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे .अशी ठाम भूमिका घेणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रेश्मा देशमुख व माजी उपसरपंच विकास नाळे यांनी जाहीर केले आहे. याबाबत लवकरच कोळकीतील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे..व जनतेमध्ये जाऊन लोकांनाही याबाबतची जागृती करणार आहे.