फलटण – फलटण शहरावर आलेल्या गंभीरपूर परिस्थितीच्या दरम्यान आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काळात चांगले काम केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी निखिल मोरे आणि नगरपालिकेतील सर्व कर्मचारी यांचा खास सत्कार करून शाबासकीची पाठ थोपटली.

फलटण शहरावर नुकत्याच ओढवलेल्या पुर परिस्थिती काळात व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे केलेले उत्तम नियोजन तसेच पालखी पुढे मार्गस्थ झाल्यावर तात्काळ पालखी तळाची काही तासात केलेली स्वच्छता याबद्दल फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे व कर्मचारी यांचा सत्कार महायुतीच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेत केला.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार साडी चोळी देऊन करण्यात आला. आतापर्यंत नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची कोणीच फारशी दखल घेतली नव्हती मात्र तालुक्यात ओढवलेल्या गंभीर पुरस्थिती दरम्यान दिवस रात्र एक करून शहराची स्वच्छता करण्याबरोबरच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान अतिशय चांगले नियोजन केल्याबद्दल माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेत जाऊन केलेल्या सत्काराबद्दल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
Back to top button
