पुणे – तायवानची आघाडीची टेक्नॉलॉजी कंपनी एसुसने पुण्यात आपल्या प्रमुख सामुदायिक उपक्रम : बियॉन्ड इनक्रेडिबल विद्य एसुस-ध्या दुसन्या अध्यायाचे आयोजन केले एंटीसोधन पुणे येथे आयोजित वा उत्साही कम्युनिटी मीट अपमुळे गेमिंग समुदायाला एकत्र आणले गेले आणि दिवसभर चालणाऱ्या संवादात्मक सत्रांत लोकांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला या सत्रांमध्ये सहभागी नागरिकांनी एसुस बैंड व त्यांच्या नव्या उत्पादनांबाबत चर्चा केली

पहिल्या अध्यायाना मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारावर एसुस हा उपक्रम इतर शहरांतही नेण्याची योजना आखत आहे जेणेकरून लोकांना प्रत्यक्ष उत्पादनाचा अनुभव घेता येईल. त्यावर प्रतिक्रिया देता येईल आणि सामुदायिक संवाद अधिक दृढ करता येईल पुणे चॅप्टरमध्ये उपस्थिताना आरओजी जेफीरस जी १४ आरओजी फ्लो झेड १३ नुकतंच लाँच झालेले विवोबुक १४ स्लिप आणि स्नॅपड्रॅगन संचालित झेनबुक ए १४ यांसारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांबाबत माहिती मिळाली
या कार्यक्रमात थरारक लाइव्ह गेमिंग बॅटन्स विशेष प्रॉडक्ट डेमो क्रिएटर सेशन्स आणि क्रिएटर्ससोबत थेट संवाद यांचा समावेश होता गेमर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी व्यावसायिक दर्जाच्या गेमिंग स्ट्रीमिंग व स्टेट क्रिएशनसाठी खास डिझाइन केलेल्या नवीनतम जारजी लॅपटॉप्स व अक्सेसरिजचा प्रत्यक्ष अनुभव मेतला
या प्रसंगी बोलताना कंझ्युमर आणि गेमिंग पीसी एसुस इंडियाचे उपाध्यक्ष अर्नाल्ड सू म्हणाले वियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस या उपक्रमाद्वारे आम्ही आमच्या समुदायाशी तंत्रज्ञानाबाबत अर्थपूर्ण व प्रत्यक्ष संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत ही मोहीम म्हणजे लोकांच्या अपेक्षा व आकाक्षांवर लक्ष केंद्रित करून असे उत्पादन तयार करणे जे केवळ आजच्या गरजा पूर्ण करत नाही तर झपाट्याने बदलणान्या जीवनशैलीला देखील पूरक ठरेल आमच्यासाठी ग्राहक म्हणजे सहप्रवासी आहेत आणि या उपक्रमाद्वारे आम्ही त्यांच्याशी अजून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहोत
बेंगळुरुमध्ये झालेल्या पहिल्या बियॉन्ड इनक्रेडिबल विय एसुस उपक्रमास मिळालेल्या यशानंतर, त्याचा दुसरा अध्याय पुण्यात पार पडला या संवादात्मक व्यासपीठामुळे एसुसच्या संपूर्ण इकोसिस्टीमशी ज्यात समुदाय सदस्य कंटेंट क्रियटर्स आणि स्थानिक मीडिया यांचा समावेश आहे अधिक जवळीक साधता आली बंगळुरुतील पहिल्या चॅप्टरमध्ये ८५ पेक्षा अधिक सहभागी होते पुण्यातील उपक्रमामध्ये स्थानिक तत्रज्ञान समुदायाला आसुसच्या नवकल्पनांचा अनुभव घेण्याची मानवपंक सत्रांमध्ये सहभागी होण्याची आणि बॅडशी थेट संवाद साधण्याची संधी मिळानी आता एसुस हा सामुदायिक उपक्रम २०२५ दरम्यान भारतातील इतर प्रमुख महानगरांमध्येही विस्तारण्याच्या तयारीत आहे कस्टमाइझ्ड अनुभव देणे सहयोगात्मक मच उपलब्ध करणे वापरकर्त्यांना नव्या इनोव्हेशनपर्यंत रवकर पोहोच मिळवून देणे आणि एक सशक्त व सक्रिय टेक कम्युनिटी तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे
Back to top button
