स्थानिक

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज फलटण तालुक्यात आगमन,तरडगाव नजीक चांदोबाचा लिंब येथे होणार पहिले उभे रिंगण

माऊलीच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

फलटण -आळंदीहुन पंढरपुरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवार दिनांक 27 जून रोजी फलटण तालुक्यात प्रवेश करणार असून या सोहळ्याच्या तालुक्यातील तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान वारकर्यांच्या सेवेसाठी शासनाच्या सर्व विभागांसह फलटणकर सज्ज झाले आहेत पालखी मार्गावरील पहिले उभे रिंगण तरडगाव नजिक चांदोबाचा लिंब येथे आज दि.27 रोजी  होणार आहे

फलटण तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणा पालखी सोहल्यासाठी सज्ज झाली आहे तालुक्यातील जनतेलाही पालखी आगमनाचे वेध लागले आहेत फलटण तालुक्यातील प्रत्येक पालखी तळावर नियंत्रण कक्ष स्थापण केला असून नायब तहसिलदार , अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तलाठी, लिपीक, पोलीस पाटील, कोतवाल यांचे पथक प्रत्येक नियंत्रण कक्षावर सर्व विभागांचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत.

पालखी मार्गावर अनेक ठिकाणी टँकर भरणेची सोय करण्यात आली आहे. पालखी मार्गावर खाजगी व सार्वजनिक मिळून २७६ विहीरी व ५० बोअर वेल्स आहेत. येथील सर्वांचे पाण्याचे नमूने तपासले आहेत.  सर्व पालखी तळ व तिकडे जाणारा रस्ता व्यवस्थित असून डांबरीकरण केल्याने कोणतीही अडचण नसल्याचे शासकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी महावितरणचा नियंत्रण कक्ष असणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे १० वैद्यकीय अधिकारी व अण्य ३० कर्मचारी दोन ॲम्ब्यूलन्स तर तालुका वैद्यकीय अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ३७ वैद्यकीय अधिकारी, १३८ वैद्यकीय कर्मचारी ५ गाड्यांसह वैद्यकिय पथके उपलब्ध असणार आहेत.  शिवाय १०८ क्रमांकावर २ ॲम्ब्यूलन्सही उपलब्ध राहणार आहेत.

पालखी सोहळ्यातील सहभागी असणाऱ्या लाखो वारकर्यांची गैरसोय होऊ नये या करीता 25 जून पासूनच नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. फलटण नगर पालीकेच्यावतीनेही पालखी तळावर चोख व्यवस्था व पुरेसा पाणी साठा करणेत आला आहे. अन्न व औषध विभागा मार्फत पालखी मार्गावरील खाद्य नमुने तपासण्यासाठी ४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या उपविभागांतर्गत येत असलेल्या सर्व रस्त्यांची डागडूजी करण्यात आलेली आहे. पालखी काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या करीता पालखी तळ व सर्वत्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा 27 जुन रोजी तरडगाव, 28 जून फलटण व 29 जून रोजी बरड असे तीन मुक्काम असून 30 जूनला दुपारी हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

दरम्यान  पालखी मार्गावरील पहिले उभे रिंगण तरडगाव येथे दिनांक 27 जून रोजी दुपारी 4 वाजता होणार असून तत्पूर्वी कापडगाव नजीक सरदेचा ओढा येथे पालखी सोहळा लोणंद येथील मुक्काम उरकून फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे.यावेळी तालुक्याच्या सीमेवर माऊलींचे स्वागत आ सचिन पाटील,माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,माजी आ.दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर सर्व प्रशासकीय अधिकारी करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button