स्थानिक

CET परीक्षेत ही यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण चे विद्यार्थी फलटण तालुक्यात प्रथम…

फलटण – एच एस सी व एस एस सी बोर्ड परीक्षेत व MHT-CET व NEET प्रवेश परीक्षेत ही यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण चे विद्यार्थी फलटण तालुक्यात प्रथम आले आहेत.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण मधील विद्यार्थ्यांनी इयत्ता-१०वी व इयत्ता -१२वी २०२५ बोर्ड परीक्षेमध्ये फलटण तालुक्यात सर्वात जास्त गुण मिळवून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता-१२वी शास्त्र शाखेमध्ये पार्थ नितीन जाधव हा विद्यार्थी ८६.६८ ℅गुण मिळवून तर इयत्ता-१०वी मधील *कु.निंबाळकर प्रगती गजानन* ९७.६०% गुण मिळवून *फलटण तालुक्यात *प्रथम* आलेले आहेत. तसेच फलटण तालुक्यात पार्थ नितीन जाधव याने NEET परीक्षेत- ५८२ गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादित केला आहे

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील यशवंत MHT-CET, JEE, NEET मार्गदर्शन वर्गामध्ये वेदांत नरेश सोनगिरे याने ९९•४५ पर्सेंटाइल गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच आदित्य अजित नांदले  याने MHT-CET परीक्षेत ९६.५२ पर्सेंटाइल घेत दुसरा क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केलेले आहे. याच बरोबर कॉमर्स विभागातील सिद्धेश संतोष लाळगे या विद्यार्थ्याने बोर्ड परीक्षेमध्ये अकाउंटन्सी या विषयात १००/- पैकी १००/-गुण मिळवून यश संपादीत केले आहे.

 उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव  डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, नियामक मंडळाचे सदस्य  महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके ) तसेच प्रशालेचे प्रभारी प्राचार्य  पी डी घनवट व विभाग प्रमुख ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button