Uncategorized

अनिल कदम यांना बाजरी पिक स्पर्धेत कृषी विभागाचा जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक

फलटण – सन २०२४/२५ च्या खरीप हंगामातील पीक स्पर्धा मधील बाजरी पिक स्पर्धेत सातारा जिल्हा स्तरावर प्रयोगशील शेतकरी, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते,कृषी मित्र  गिरवी(तालुका फलटण) येथील अनिल बुवासाहेब कदम  यांना सर्वसाधारण गटात तृतीय क्रमांक मिळाला आहे.असे शासकीय परिपत्रकानुसार कृषी विभागाच्या शासकीय अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांनी जाहीर केले आहे.

अनिल बुवासाहेब कदम हे नैसर्गिक व सेंद्रिय पध्दतीने शेती करत आहेत.शेतीत नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान राबवून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मागील वर्षी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या गहू पिकाच्या उत्पादन घेतले होते.यावर्षी भगव्या वाणाची डाळींब बागेची लागवड केली आहे.शेत बांधावर नारळाच्या रोपांची लागवड सुरु आहे. “शेती उत्पादन खर्चात बचत आणि शेती उत्पादनात वाढ,शेती उत्पादन थेट ग्राहकांना विक्री ” या त्रिसूत्री मुद्यांवर शेतकरी शेती फायद्याची करु शकतो.असा विश्वास सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते बाजरी पिक स्पर्धा विजेते शेतकरी अनिल बुवासाहेब कदम यांनी सांगितले.

अनिल बुवासाहेब कदम यांनी बाजरी पिक स्पर्धेत सातारा जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल सातारा जिल्हा परिषद साताराच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे , उपविभागीय कृषी अधिकारी खालिद मोमीन, फलटण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड,मंडल कृषी अधिकारी शहाजी शिंदे,उपकृषी अधिकारी अशोक जगदाळे,सहायक कृषी अधिकारी सुनील निकम, सहायक तंत्र अधिकारी किशोर यादव, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार, फलटण तालुक्यातील तहसीलदार अभिजित जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button