महाराष्ट्र

फलटण रायडर्स सायकल वारीचे २१ जूनला पंढरपूरला प्रस्थान

       फलटण – आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर येथे पोहोचतात पंढरपूर पर्यंत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनेक नैसर्गिक अडथळ्यांना पार करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात त्याच पद्धतीने आपला व्यवसाय नोकरी यामधून वेळ काढून सायकलवारी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे आषाढी एकादशी निमित्त फलटण रायडर्स यांनी सायकल वारीचे प्रथमच आयोजन केले आहे. दिनांक २१जून २०२५रोजी फलटण मधून प्रभू श्रीरामाचे दर्शन करून पंढरपूरसाठी फलटण रायडर्स प्रस्थान ठेवणार आहेत. फलटण रायडर्सच्या वारीचे हे पहिलेच वर्ष आहे यामध्ये फलटण व परिसरातील १२ वर्षे वयापासून ७२ वर्षे वयापर्यंतच्या सायकल पटूंचा सहभाग आहे.

             पहाटे पाच वाजता फलटण मधून प्रस्थान केल्यानंतर प्रथम शिंगणापूर फाटा येथे पहिला थांबा असेल दुसरा थांबा कुडूस येथे असणार आहे सायकलवारीतील सर्व सहभागी सदस्य भोजन व विश्रांतीसाठी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी थांबणार आहेत त्यानंतर ही वारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंढरपूर मध्ये प्रवेश करणार आहे 

        *सायकल संमेलन*

पंढरपूर मध्ये २१ जून रोजी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून ७५ ग्रुपचे तीन हजार हून अधिक सायकल स्वार दाखल होणार आहेत. दिनांक २२जून रोजी सकाळी ५:४५ वाजता सर्व सायकल स्वरांची नगर प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. सायकल संमेलनात माननीय अमित समर्थ यांचे सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. या निमित्ताने फलटण रायडर्सच्या माध्यमातून फलटण मधून प्रथमच सहभागी होणाऱ्या ८० सायकल स्वरांना या आनंदवारीचा अनुभव घेता येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button