स्थानिक

आपतग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे – माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर

नदी, ओढे, नाले यावरील अतिक्रमणामुळेसुद्धा मोठे नुकसान

फलटण – फलटण तालुक्यात अवकाळी पावसाबरोबरच ओढे नाले नदी यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पाणी गावात ,घरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

   जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानी ची पाहणी करुन सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर मदत करण्याचे आश्वासन दिले . यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, जिल्हापोलीस प्रमुख तुषार दोशी ,जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अधिकारी यामीनी नागराजन , प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ . अभिजीत जाधव,नायब तहसीलदार  अभिजित सोनवणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,मुख्याधिकारी निखिल मोरे,जिल्हा बॕकेचे संचालक शिवरुपराजे खर्ङेकर ,माजी नगराध्यक्ष दिलिपसिंह भोसले , माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले , ङि. के. पवार,माजी नगरसेवक अशोकराव जाधव,सचिन आहीवळे,अजय माळवे, अनुप शहा,सुधीर  आहीवळे,आदी मान्यवर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. 

  फलटण तालुक्यातील गोखळी , फलटण शहरातील हरीबुवा मंदिराच्या जवळील पुलाची आणि बाणगंगा नदीच्या काठावर असलेल्या शनिनगर येथील पूरग्रस्त घरांची पाहणी करून तेथील नागरिकांशी जिल्हाधिकारी संतोष पाटील ,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.सचिन पाटील यांनी संवाद साधला .

यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर  यांनी  बोलताना अवकाळी पावसामुळे फलटण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे  सांगून सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर मदत करण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे.   अचानक आलेल्या पावसामुळे फलटण शहर व तालुक्यातील अनेक रस्ते नाले घरी वाहून गेले आहे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी,ओढे, नाले यावर केलेल्या  अतिक्रमणामुळे अनेकांच्या घरात शेतात पाणी घुसले होते.अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेले त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करण्याची आणि पूलांची उंची वाढवण्याची मागणी आपण प्रशासनाकडे केली आहे. अनेक बोगस कामांमुळे सुद्धा शेती, पिकाचे व पूलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याचीही चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.

फलटण तालुक्यातील पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत जेवढी त्यांना मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करत आहोत.  वेळ प्रसंगी स्वतः पदर मोड सुद्धा करू अशी ग्वाही देऊन नुकसान भरपाई संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून रस्ते ,पूल या कामासाठी तातडीने निधीची मागणी केली आहे असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button