फलटण – फलटण तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना शहरातील राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत आहिवळे ऊर्फ बारीकराव यांनी स्वतः अनेकांना मदतीचा हात दिला. गरजूंना मदत केली.
आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीच्या पावसामुळे तालुक्यातील ओढया नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांना मदत करण्याची सूचना राजे गटाच्या कार्यकर्त्यांना केली होती. या सूचनेनुसार राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत अहिवळे उर्फ बारीकराव यांनी प्रत्यक्ष आपतग्रस्त बांधवांना मदत केली.