स्थानिक
रक्षक रयतेचा न्यूज परिवारातील गुणवंत पाल्याचा सत्कार संपन्न

फलटण – विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या रक्षक रयतेचा न्यूज टीम मधील सदस्यांच्या पाल्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका शाळेत शिकून इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 95.40% गुण मिळविणाऱ्या तहूरा नियाझ मणियार,92% मार्क मिळविणारा फलटणचा शिवम नामदेव शिंदे आणि विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन फलटणचे नाव उंचावणारा राजवीर धीरज कचरे यांचा रक्षक रयतेचा न्यूजतर्फे फलटण न्यायालयातील विधीतज्ञ ॲड नामदेव शिंदे,सौ सुवर्णा शिंदे आणि सौ नंदा बोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी तहूरा नियाझ मणियार हिला कीर्ती बुक सेलरचे प्रशांत दोशी यांनी पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य भेट दिले.
यावेळी नीता दोशी, सौ मनीषा घडिया,सौ रुपाली कचरे,सौ अनुराधा रनवरे,सौ आसिफा शिकलगार, प्रशांत धनवडे,इम्तियाज तांबोळी,तात्या गायकवाड,कमलेश भट्टड,रक्षक रयतेचा न्यूजचे संपादक नसीर शिकलगार उपस्थित होते.
