फलटण – . मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे माध्यमातून एकत्र फलटण शहरातील प्रभागांचा पहानी दौरा सुरू करण्यात आला आहे.
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी नुकतेच प्रत्येक प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर केले आहेत. यातील प्रत्येक प्रभागासाठी दिलेले 50 लाख रुपयांचे प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी जसे की गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण करणे या साठी खर्च करावयाचे आहेत अशा सूचना मा. खासदार व आमदार यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे बुधवार पेठ प्रभाग क्रमांक ९ मध्ये हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात उपस्थित गटनेते अशोकराव जाधव, सरचिटणीस जयकुमार शिंदे , पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते , सुधीर अहिवळे माजी नगरसेवक सचिन अहिवळे, अजय माळवे , रणजितसिंह भोसले , फिरोज आतार फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर, तानाजी कदम, अजिंक्य बेडके, राहुल पवार, राजाभाऊ शिरतोडे, अँड सचिन शिंदे सुनील घोलप , बंडू भोई, गणेश माने, विठ्ठल चोरमले , गोपी चोरमले, विजयराव चोरमले व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते