फलटण – फलटण शहरातील मलटण भागातील माजी खासदार स्व .हिंदूरावजी नाईक निंबाळकर दर्गा मज्जिद ट्रस्ट मलटण येथे आज रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 6 वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
या इफ्तार पार्टीसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील ,माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव ,सचिन अहिवळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या इफ्तार पार्टीसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मज्जीद ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.