महिला विशेष
फलटण मध्ये सौ नाजनीन तांबोळी यांच्या पंजाबी डिशेस व्यवसाय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण – महिला दिनानिमित्त फलटण येथे किचन क्वीन कुकिंग क्लासेस, गोविंद डेअरी व AV ज्वेलर्स तर्फे पंजाबी डिशेस व्यवसाय प्रशिक्षण घेण्यात आले.त्याला महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला फलटणच्या माजी नगरसेविका सुभद्राताई नाईक निंबाळकर, AV ज्वेलर्स तर्फे सौ सारिका ताई शहाणे तसेच फलटण तालुक्यामधील शेकडो महिलांनी उपस्थित राहून या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेतला या ठिकाणी किचन क्वीन कुकिंग क्लासेस च्या संचालिका सौ नाजनिन तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी शेकडो महिला उपस्थित होत्या.