महिला विशेष

जागतिक महिला दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महिलांचा सत्कार सोहळा संपन्न.. 

मा.राजनकाका देशमुख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन 

 फलटण –  कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

     

महिला दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.राजनकाका देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  ला. स्वाती चोरमले, ला. उज्वला निंबाळकर, ला. सुनिता कदम, योग प्रशिक्षक सौ विद्या शिंदे , मयुरी किनगी, श्री राहुल देशमुख, नासिर शिकलगार , अक्षय बिचुकले व Astagfirullah कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते. या शिबिरात  29 रक्तदात्यानी रक्तदान केले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या, तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. महसूल सहाय्यक स्नेहा गवळी, डॉ.ऋतुजा चंद्रकांत शिंदे, एम बी बी एस. , एक्साइज अधिकारी अक्षदा नाळे, टाऊन प्लनिंग ऑफिसर रवीना रमेश भोसले, पंजाब नशनल बँक अधिकारी प्राजक्ता घनवट, तसेच योग प्रशिक्षक सौ. विद्या शिंदे यांचा गेल्या 20 वर्षातील त्यांच्या सेवेसाठी आणि 27 वर्षे अविरत शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. सुजाता गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तसेच महिला दिनानिमित्त स्कूलमधील माता पालकांना मार्गदर्शन सत्र आयोजित केले. यामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी योग शिबिर आयोजित करून सौ. विद्या शिंदे यांनी सर्व महिलांना आहार कसा असावा व त्यासोबत काय काळजी घ्यावी जेणेकरून कोणताही आजार आपल्यापासून दूर राहील व आरोग्य तंदुरुस्त राहील याविषयी खूपच अप्रतिम माहिती या माध्यमातून उपस्थित महिलांना दिली आणि योगाचे महत्व पटवुन सांगितले.

यावेळी उपस्थित सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ.सुजाता गायकवाड, सौ.माधुरी माने, सौ.अहिल्या कवितके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button