फलटण – मॅग आणि माऊली फाउंडेशन मुंबई संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर फलटण येथे तृतीय वर्धापन दिनानिमित्त दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय कॅलिपर मोफत वाटत शिबिराचे आयोजन दिनांक 22 मार्च रोजी करण्यात आले आहे.
सदर शिबिर दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर रिंग रोड, डीएड चौक फलटण येथे होणार आहे.प्रथम नोंदणी करणाऱ्या 100 दिव्यांगासाठी हे शिबिर असून यासाठी दिनांक 20 मार्च पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.इच्छुकांनी जनसेवा डायग्नोस्टिक 9529233067, तात्यासाहेब गायकवाड 8600392444,प्रशांत धनवडे 9890043600,प्रवीण लोंढे 787547103,रवींद्र साळुंखे 9890375485,श्रीकृष्ण पळसे 9325881605 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.