फलटण – महाशिवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्यावतीने प. पु .राजनकाका देशमुख महाराज यांच्या शुभराज निवासस्थानी महादेव माळ कोळकी येथे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.

महाशिवात्रीनिमित्त शंभू महादेवाला अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण कार्यक्रम झाले. त्यानंतर प पू राजनकाका देशमुखमहाराज यांचे सुमधुर प्रवचन झाले यानंतर महाप्रसाद झाला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
Back to top button