फलटण – स्वराज फाउंडेशन व शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार यांनी दिली.

शुक्रवार पेठ येथे श्रीमंत रामेश्वर गणपती मंदिर मध्ये हळदीकुंकू समारंभ होणार असून यावेळी ३१ पैठणी व इतर बक्षिसे जिंकण्याची संधी लकी ड्रॉ द्वारे मिळणार आहे.
सदरचा कार्यक्रम स्वराज फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सर्व महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन फिरोज आतार यांनी केले आहे.
Back to top button
