स्थानिक

अजित मल्टीस्टेट सोसायटीच्या कर्जप्रकरणी महिलांचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर उपोषण जिल्हा पोलीस प्रमुखांची लक्ष देण्याची ग्वाही, आंदोलन तात्पुरते मागे

फलटण – अजित मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे फलटण तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत फलटण शहर भाजप अध्यक्ष आमच्या यांनी प्रजासत्ताक दिनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर महिलांसह आंदोलन केले यावेळी पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने माजी खासदार रणजितसह नाईक नंबर यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याशी थेट चर्चा होऊन तर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  सासवड येथील स्थित अजित मल्टी को ऑप क्रेडिट सोसायटी सासवड तर्फे शाखा, लोणंद,खंडाळा व साखरवाडी येथील शेकडो महिलांच्या कागदपत्रांची अफरातफर करत शाखा अधिकारी,कर्मचारी, वसुली अधिकारी व त्यांचे खाजगी एजंट यांनी शेकडो महिलांना बचतगट स्थापन करण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड झेरॉक्स प्रति घेऊन परस्पर बचतगट माध्यमातून लाखो रुपये परस्पर हडपले आहे. सर्व महिलांना शिवाजीनगर येथील मे.न्यायालयाकडून समन्स, विविध बँकांची खाती गोठली जाणे तसेच संबंधित शाखांकडून त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती आदेश,नोटीस बजावल्याचे समजताच आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच या महिलांनी वारंवार सदर शाखा अधिकारी यांचेकडे आपल्यावर अन्याय झाला असल्याचे पत्रव्यवहार केला. शाखेच्या अधिकारी, कर्मचारी व त्यांचे खाजगी एजंट यांचेकडून लाखो रुपयांचा अपहार झाला असून या पीडित महिलांच्या नावे त्यांनी परस्पर कर्ज घेतलेच निदर्शनास आणून दिले होते. मात्र पैशाच्या व सत्तेच्या जोरावर अजित मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी सासवडच्या संचालक मंडळाने प्रकरणे दडपली असल्याने या सर्व पीडित महिलांनी फलटण भाजपा शहर अध्यक्ष अनुप शहा व यशवंत उर्फ गणेश दणाने (तालुका अध्यक्ष माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका) यांचेकडे धाव घेत प्रकरणात लक्ष घालून न्यायाची मागणी केली.

गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या अनुप शहा व यशवंत उर्फ गणेश दणाने यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मूळ एकूण 96 तक्रारी दाखल केल्या होत्या त्यावर एक महिना उलटूनही पोलीस प्रशासनाकडून दखल न घेतल्याने दि २६ जानेवारी२०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आंदोलन उपोषण करणार असल्याचे कळवले असता, ठरले दिवशी दीडशे पेक्षा जास्त पीडित महिला,जेष्ठ नागरिक,पुरुष व काही महिला आपल्या लहान मुलांसह आपल्या इतर नातेवाईकांसोबत आंदोलन उपोषणस्थळी दाखल झाल्या. दरम्यान आपल्या तक्रार अर्जांवर शासन नियमावलीप्रमाणे करवाई तथा चौकशी न झाल्याने तसेच जाब विचारला म्हणून महिलांवर अरेरावी करणारे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांचेवर महिला आक्रमक होत शाब्दिक बाचाबाची झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

दरम्यान आंदोलन, उपोषणस्थळी सुरू असलेल्या प्रकरणाबद्दल अनुप शहा यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मदतीची मागणी केल्यावर त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांस या प्रकरणाची कल्पना दिली. पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ यांच्यासह फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाचे काही कर्मचाऱ्यांची सातारा विश्रामगृह येथे बैठक बोलावून उपोषणकर्त्यांच्या तक्रार अर्जांवर चर्चा करत त्यांच्या प्रकरणात एक समिती नियुक्त करत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन, उपोषण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळात वेळ काढून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button