फलटण – फलटण शहर व तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत नेहमी आग्रही असणारे, सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी नेहमी आंदोलनात सहभागी होणारे, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशनचे शिबीर एच व्ही. देसाई पुणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक युवकांनी रक्तदान केले.111 रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच नेत्र तपासणीसाठी 148 नागरिकांनी नेत्र तपासणी सहभाग घेऊन नेत्र तपासणी करून घेतली. यामध्ये लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच 30 नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी पुणे या ठिकाणी पाठवण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रमात ,आश्रम शाळेत, मूकबधिर शाळेत तसेच मदरसा मध्ये फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील ,फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, महानंदा डेरीचे माजी संचालकडि.के.पवार, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अशोक जाधव,माजी नगरसेवक सचिन अहीवळे , अनुप शहा, जाकीरभाई मनेर, फिरोज आतार , अजय माळवे ,सुधीर अहीवळे.रेल्वे नियोजन मंडळाचे सदस्य रियाजभाई इनामदार,भाजपा कला व सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश उर्फ बाळासाहेब कदम,फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल सस्ते, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष बबलू मोमीन, मेहबूबभाई मेटकरी, प्रकाश जाधव,शंकर उर्फ बंडूशेठ कदम, राजाभाऊ देशमाने ,राहुल शहा, ॲड ऋषिकेश काशीद, श्रीकांत पालकर ,चिकू चोरमले,निलेश चिंचकर, निखिल उपाध्ये, विकी जाधव, संदीप करणे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण शहर युवक अध्यक्ष प्रीतम जगदाळे, ताजुद्दीन बागवान, अल्ताफभाई पठाण, सनी काकडे, मोहन पोतेकर,सुनील निंबाळकर , प्रशांत अहिवळे,मोहन पोतेकर, ज्येष्ट पत्रकार अरविंदभाई मेहता,यशवंत खलाटे,युवराज पवार, शक्ती भोसले, डॉक्टर शिंगाडे, सिटी बजार चे मालक डॉ. सूर्यकुमार दोशी,रिंकू शिंदे
तसेच फलटण शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यापारी वर्ग या सर्व घटकातील नागरिकांनी आमिरभाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Back to top button
