फलटण —माऊली फाउंडेशन फलटण यांच्यावतीने सामूहिक रक्षाबंधन दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सहस्त्रकुंड धर्मशाळा दगडी पूल फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे यावेळी आलेल्या सर्व महिलांकडून माजी नगरसेवक अनुप शहा यांना राखी बांधण्यात येणार असून अनुप शहा यांच्याकडून बहिणीला गिफ्ट व भोजन चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला भाऊ अनुप भैय्या यांना राखी बांधावी असे आव्हान माऊली फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे