स्थानिक

होंडा बिगविंग पुणे ईस्टच्या वतीने सीबीयू  गाड्यांचे थाटामाटात लॉन्चिंग व वितरण 

पुणे  :-भारतातील सुप्रसिद्ध होंडा कंपनीने आपल्या प्रीमियम श्रेणीतील मोटारसायकलींच्या नवीन सीबीयू (CBU Completely Built Units) मॉडेल्सचे पुण्यात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय जवळील बिग विंग होंडाच्या अधिकृत शोरूममध्ये भव्य लॉन्चिंग केले. तसेच खरेदी करण्यात आलेल्या ग्राहकांना त्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी खास ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक बाईकची वैशिष्ट्ये थेट सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आली. 

या वेळी कंपनीने ‘X – ADV 750’, ‘CBR 650R’ आणि ‘CB 650R’ या तीन नव्या मॉडेल्स सादर केल्या. हे सर्व मॉडेल्स जागतिक दर्जाचे असून भारतीय रस्त्यांवर नव्या उमेदीने धावणार आहेत. तसेच त्या आकर्षक गाड्यांमुळे भारतीय तरुणाई फारच उत्साहाने गाड्या खरेदी करेल, असा तर्क सांगितला जात आहे.

नवीन बाईक्सचे आकर्षक अनावरण, केक कापणे, लेझर शो, लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरणात जल्लोषाचे क्षण अनुभवायला मिळाले. CBR 650R आणि CB 650R ह्या बाईक स्पोर्ट्स बाइक असून ती उच्च गती व जलद त्वरणासाठी ओळखली जाते. तर X- ADV 750 ही साहसप्रेमींची निवड ठरणार असून रफ अँड टफ राईडसाठी उपयुक्त आहे. 

या बाईक्स केवळ परदेशी बाजारासाठी मर्यादित राहू न देता भारतीय ग्राहकांसाठी थेट सीबीयू स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्याने कंपनीचा आत्मविश्वास आणि ग्राहकांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, या गाड्या आधीपासूनच जागतिक स्तरावर लोकप्रिय असून आता त्या भारतीय ग्राहकांच्या आवाक्यात येत आहेत.

या प्रसंगी होंडा बिगविंग सेल्स हेड राकेश स्वामी, बाणेर ब्रँचचे सेल्स मॅनेजर अमित शुक्ला, जे एम रोड ब्रँचचे प्रसाद पाटुकले, सी आर एम मोनिका लोणकर, होंडा बिगविंग एरिया इन्चार्ज वेदांत परमार सान या सह सर्व बिगविंग स्टाफ, बाईकप्रेमी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्राहकांना बाईक टेस्ट राईडची संधी देण्यात आली. अनेक बाईकप्रेमींनी नवीन मॉडेल्सवर स्वार होऊन त्यांच्या वैशिष्ट्यांचा अनुभव घेतला. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहता या लॉन्चिंगला प्रचंड यश लाभल्याचे स्पष्ट दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button