स्थानिक

गुणवरे गावचे सुपुत्र आणि अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांना उत्कृष्ट महसूल अधिकारी पुरस्कार.

गुणवरे ~~ मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अप्पर तहसीलदार  निलेश गौंड  यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव  विकास खारगे  यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कोकण विभाग विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

शासनाच्या वतीने एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो यावेळी महसूल विभागातून उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांची निवड केली जाते या कार्यक्रमादरम्यान गुणवरे गावचे सुपुत्र  निलेश गौंड अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर यांचा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला गौरव करण्यात आला निलेश गौंड  यांचे महसूल विभागातील कार्य व ज्ञान वाखण्याजोगे आहे त्यांच्या कार्य शैलीमुळे सर्वसामान्य जनतेची अडचण सोडवण्यासाठी तत्पर असल्याने प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये शासन दरबारी ते कार्यप्रसिद्ध आहेत त्यांनी या अगोदरही विदर्भातील चंद्रपूर नागपूर विभागात उत्कृष्ट असे कार्य केले आहे अतिवृष्टीने विदर्भात हाहाकार उडालेला असताना एनडीआरएफच्या पथकासोबत स्वतः पूराच्या पाण्यात उतरून लोकांचे जीव वाचवून पुनर्वसन केले आहे त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या महसूल सेवेमध्ये वाखणण्याजोगे आहे त्यांच्या या कार्यकर्तुत्वाचा एक प्रकारे गौरवच शासनातर्फे करण्यात आला आहे श्री निलेश गोंड साहेब यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री दत्तामामा भरणे,  कांतीलाल गौंड प्रगतशील बागायतदार  शिवाजी अण्णा लंगुटे चेअरमन भैरवनाथ सोसायटी, डॉक्टर धनाजीराव आटोळे संचालक स्वराज पतसंस्था, श्री .अमोल आढाव पोलीस पाटील संघटना फलटण तालुका अध्यक्ष, अंसार भाई शेख, अरुण गौंड,.रामदास गौंड संचालक डायनामिक्स डेअरी गुणवरे, .जेपी गावडे दुय्यम निबंधक सहकारी संस्था फलटण, शशिकांत आढाव उपसंपादक साप्ताहिक रक्षक रयतेचा, राजू बनसोडे कार्यकारी संपादक साप्ताहिक रक्षक रयतेचा, शिवाजीराव पांडुरंग गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य,  युवराज सांगळे तसेच सण 1998 इयत्ता दहावी संपूर्ण बॅच व फलटण तालुक्यातून तसेच मुंबई इंदापूर दौंड बारामती तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button