स्थानिक

गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

फलटण ~~ गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ या.भिकाजीराव पाटील स्थापित नोंदणीकृत व अधिकृत असणाऱ्या संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम मौजे फलटण येथील माळजाई मंदिरात राज्याचे संघटनेचे विद्यमान अध्यक्ष माननीय  बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सूचनेनुसार पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनुमंतराव सोनवलकर, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र व निरीक्षक म्हणून  प्रदीप गाढवे सातारा जिल्हा अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस पाटलांच्या विविध मागण्या व संघटनेच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ या अधिकृत संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने फलटण तालुका अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला यामध्ये गुणवरे गावचे बेस्ट पोलीस पाटील अवॉर्ड विजेते कर्तव्यदक्ष पोलीस पाटील  अमोल आढाव यांची फलटण तालुका अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून वडले गावच्या पोलीस पाटील स्वाती घनवट व खटके वस्ती गावचे पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून चांभारवाडी गावचे पोलीस पाटील स्वप्निल धुमाळ यांचे निवड करण्यात आली.

कार्याध्यक्ष म्हणून दयानंद चव्हाण पाटील शेरेची वाडी.

 संघटनेचे इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे 

1.सहसचिव रसिका भोसले पोलीस पाटील चौधरवाडी 2.संपर्कप्रमुख हनुमंत सोनवलकर पोलीस पाटील भाडळी बु,खु व सासकल, व सौ.प्रमिला ढेंबरे मॅडम बोडकेवाडी

3.संघटक प्रणाली बोडके पोलीस पाटील विठ्ठलवाडी 

4.मकरंद पखाले पोलीस पाटील कोळकी 

सल्लागार  

1. अशोक गोडसे पाटील आसु

2.हनुमंतराव सोनवलकर आप्पा दुधेबावी 

3.सुरेश चव्हाण अण्णा चव्हाणवाडी 

4.अमित भोईटे पाटील आरडगाव 5.प्रदीप गाढवे पाटील काळज 

6.अजित बोबडे पाटील बीबी

यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

सदर निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष व महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस राबणारे व्यक्तिमत्व बाळासाहेब शिंदे पाटील,कापडगावचे पोलीस पाटील नंदकुमार खताळ,  सोमनाथ जगताप सल्लागार सातारा, माजी तालुकाध्यक्ष कर्तव्य दक्ष पोलीस पाटील पिंप्रद सुनिल बोराटे, माजी सचिव तिरकवाडी चे पोलीस पाटील अमोल नाळे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक .सुनील महाडिक, तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव सो, प्रांताधिकारी.प्रियंका आंबेडकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस  सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक मठपती, पोलीस अंमलदार सागर अभंग, सामाजिक कार्यकर्ते .बजरंग गावडे .बजरंग खटके ,

डॉ धनाजी आटोळे, प्राचार्य आनंदराव आढाव , भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव.राहुल कणसे, सरपंच मनोज  गावडे, पोलीस पाटील गोखळी विकास शिंदे, युवराज सांगळे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गुणवरे,.निलेश गौंड साहेब तहसिलदार मिरा भाईंदर महानगरपालिका मुंबई सह मित्र परिवार गुणवरे, मिलिंद नेवसे आप्पा, फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, गोखळी गुणवरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button