स्थानिक

फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट- लेन्स लेगसी  व सिल्वर शोकेसचे  10 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान पुण्यात आयोजन

पुणे – फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट-1 लेन्स लेगसी व सिल्वर शोकेस आधी विविध कार्यक्रमाचे आयोजन 10 ते 19  ऑगस्ट 2025  दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे अशी माहिती  फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे चे अध्यक्ष संजय वायचळ यांनी दिली. या कार्यक्रमासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन  पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेस फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे चे उपाध्यक्ष रामनाथ भट, सरचिटणीस जी करूणाकर, खजिनदार किशोर जगदाळे,संस्थापक  व माजी अध्यक्ष सुनील कपाडिया,श्रीराम देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

.       या फोटो  फेस्ट 1 चे उद्घाटन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे  10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता  प्रसिद्ध नामांकित फोटोग्राफर  सतीश पाकणीकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हे प्रदर्शन 10 ते 13 ऑगस्ट 2025  दरम्यान  बालगंधर्व कलादालन  येथे सकाळी 10 ते सायं 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनामध्ये   रोज संध्याकाळी 5  ते 8 या वेळेत विविध मान्यवरांचे स्लाईड शो व व्याख्यान  आयोजित केलेले आहेत. तसेच फोटो फेस्ट 2  मध्ये सिल्वर शोकेस या साठ छायाचित्रांची विशेष निवडक कामे सादर केले असून या कार्यक्रमास योगदानासाठी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कला मंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे 17 ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान  सकाळी 10 ते सायं 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

तरुण व उद्योगमुख छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे विद्यार्थ्यांसाठी सवलतीची सदस्यता योजना सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या सुसंस्कृत छायाचित्र संस्थेचा भाग होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे फोटोग्राफिक सोसायटीच्या ऑफ पुणे  या संस्थेच्या  माध्यमातून शिकण्याच्या मार्गदर्शन मिळण्याच्या व स्वतःला सादर करण्याच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या फोटो फेस्ट मध्ये  सिटी थ्रू द लेन्स, नॅशनल  सॅलॉन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या फोटो फेस्टला  पुणेकर रसिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे  करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button