पुणे : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे 2025 (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे 2025 चा उद्देश इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खर्या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अँथे 2025 द्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना NEET, JEE, राज्य CETs, NTSE आणि ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो.
या वचनबद्धतेला पुढे नेत, ‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा 8वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस JEE Advanced तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी 10 ते दुपारी 1) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल. अर्ज फी ₹300 आहे. परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% पर्यंत शिष्यवृत्ती आणि आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. आकाश इन्व्हिक्टस हा अभ्यासक्रम फक्त निवडक इन्व्हिक्टस सेंटर्स मध्ये उपलब्ध आहे – दिल्ली-एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू, लखनौ, मेरठ, प्रयागराज, देहरादून, भोपाळ, इंदूर, अहमदाबाद, चंदीगड, रोहतक, हैदराबाद, नमक्कल, कोयंबतूर, भुवनेश्वर, रांची, त्रिची, विशाखापट्टणम, मुंबई, कोलकाता, दुर्गापूर आणि पटना येथे.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे (AESL) सीईओ आणि एमडी श्री. दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील 16 वर्षांपासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत, मग त्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलेही असो. आकाशमध्ये आम्हाला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये समस्यांचं समाधान शोधण्याची क्षमता आहे – जेवढं त्यांनी विचारपूर्वक आणि धाडसाने आव्हानांचा सामना केला, तेवढं ते यशस्वी ठरतात. अँथे 2025 हाच वारसा पुढे नेत आहे, जिथे पात्र विद्यार्थ्यांना योग्य साधनं, आधार आणि प्रेरणा दिली जाते, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने चमकू शकतील. आमचं मजबूत नेटवर्क आणि हायब्रिड शिक्षण पद्धतीमुळे दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि परिणामकेंद्रित बनतं आहे.
या वर्षापासून आम्ही ‘इन्व्हिक्टस एस टेस्ट’ देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
अँथे च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांत अनेक टॉप रँकर्स घडले आहेत. 2025 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षांपैकी एक ठरली आहे. AESL चे अनेक टॉपर्स त्यांच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात अँथे मधूनच केली आहे. यंदा NEET च्या टॉप 100 मध्ये 22 विद्यार्थी आणि JEE Advanced 2025 च्या टॉप 100 मध्ये 10 विद्यार्थी हे अँथे द्वारेच पुढे आले आहेत.
ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून घेतली जाईल, जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर पर्याय मिळेल. अँथे 2025 ची ऑनलाइन परीक्षा 4 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा 5 आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 415 पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.
अँथे 2025 साठी नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थी https://anthe.aakash.ac.in/home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा जवळच्या आकाश सेंटरला भेट देऊ शकतात. परीक्षा शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीसाठी ₹300 आहे. लवकर अर्ज करणाऱ्यांना 50% सूट मिळेल. ऑनलाइन परीक्षेसाठी निवडलेल्या तारखेच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेसाठी सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या पाच दिवस आधी मिळेल.
अँथे 2025 चे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील – इयत्ता 10वीसाठी 24 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 7वी ते 9वीसाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 5वी व 6वीसाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आणि इयत्ता 11वी व 12वीसाठी 4 नोव्हेंबर 2025 रोजी. सर्व निकाल अधिकृत अँथे वेबसाईटवर उपलब्ध असतील. ही परीक्षा एक तासाची असेल आणि त्यात 40 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील, जे विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि करिअरच्या इच्छेनुसार असतील. इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय असतील – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी. 10वीच्या मेडिकल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मेंटल अबिलिटी, तर इंजिनियरिंग इच्छुकांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी. 11वी-12वीच्या NEET इच्छुकांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी, तर इंजिनियरिंगसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) आता परीक्षा तयारीला नवीन उंचीवर नेत आहे – दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह: Aakash Digital 2.0 आणि आकाश इन्व्हिक्टस. Aakash Digital 2.0 हे एक AI-सक्षम, सर्व एकाच ठिकाणी असलेलं ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जे NEET, JEE आणि ऑलिम्पियाडसाठी वैयक्तिक, परवडणारी आणि प्रभावी कोचिंग उपलब्ध करून देतं. दुसरीकडे, आकाश इन्व्हिक्टस हा एक खास, टॉप JEE Advanced विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला प्रीमियम प्रोग्राम आहे, ज्यामध्ये छोट्या बॅचेस, देशातील टॉप 500 फॅकल्टी, AI-आधारित इनसाइट्स, एक्सक्लुसिव कंटेंट आणि कठोर टेस्टिंग-रिविजन मॉड्यूल यांचा समावेश आहे. हे फिजिकल + डिजिटल (Phygital) शिक्षण विद्यार्थ्यांना IIT किंवा जागतिक पातळीवरील इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अचूक मार्गदर्शन करतं.