फलटण – श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या वतीने स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांना ३० व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी व सी. एल पवार संस्थेचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके),सदस्य प्रकाश तारळकर, शिवाजीराव बेडके, हणमंतराव निकम यांच्या हस्ते स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अलौकिक यशामध्ये ज्यांनी खारीचा वाटा उचलला व आपल्या ज्ञानदानाने विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवले अशा सेवानिवृत्त गुरुजनांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा केलेला सत्कार हा अविस्मरणीय असून आम्ही संस्थेच्या ऋणात सदैव राहू असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी याप्रसंगी काढले.
त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा,बी.ए.भाग तीन, बी.कॉम.भाग तीन, डी फार्मसी कॉलेज मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व वृक्षरोप देऊन करण्यात आला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या जीवनातील अनेक आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला. त्याचप्रमाणे तत्कालीन संचालक मंडळ यांचेही ऋण व्यक्त केले. फलटण पंचक्रोशी मध्ये स्वर्गीय नानांनी ज्ञानाची बीजे रोवण्याचे काम केले. कै. नानांनी लावलेल्या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचे काम संस्थेचे माजी अध्यक्ष कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांनी केले.
संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी संस्थेसाठी दिलेल्या सेवेबद्दल व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करून हे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. या यशस्वी विद्यार्थी व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्याकरिता यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य पी . डी.घनवट व सर्व विभागाचे विभाग प्रमुखांनी तसेच सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. व्हि.के.सुरवसे व्ही.के. पर्यवेक्षिका सौ. सी.आर.रणवरे यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. एस . डी.यादव , सौ. एस. एम. तगारे यांनी केले तर आभार प्रा. एस. एन. राऊत यांनी मानले.