फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात फलटणमध्ये रविवार दिनांक 13 रोजी विठ्ठल मंदिर फलटण येथे मुक्कामी येणार आहे.
रविवार दिनांक 13 रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदिरात परतीच्या प्रवासात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. तेथेच पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. माऊलीच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी केले आहे.