स्थानिक
पालखी काळात चांगले काम केल्याबद्दल मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या पाठीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकली कौतुकाची थाप,
मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा केला खास सत्कार

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येण्यापूर्वी तसेच पालखी सोहळा झाल्यानंतर सुद्धा फलटण शहरात स्वच्छतेचे अतिशय उत्कृष्ट काम मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले असून त्यांच्या कार्यकाळात ते फलटणचा निश्चितच चेहरा मोहरा बदलतील असा विश्वास फलटण शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काळात अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल फलटण शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख,निलेश तेलखडे ,ज्ञानेश्वर पवार , राजाभाऊ देशमाने ,राहुल शहा, निखिल उपाध्याय, दीपक करवा मेहबूबभाई मेटकरी आदी उपस्थित होते.
फलटण शहरातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती.अनेक पूल मोडकळीस आले होते तसेच ठीकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते अशातच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण शहरात येत असताना फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी त्यांच्या सर्व कामगार वर्गासह दिवस रात्र काम करून शहरातील स्वच्छता केली तसेच खड्डे बुजवले पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर अवघ्या काही तासातच संपूर्ण फलटण शहराची स्वच्छता केली. आपल्या कामाची कार्यक्षमता त्यांनी दाखवून दिल्याचे कौतुक आमिरभाई शेख यांनी केले.
आपल्या कामाच्या जोरावर मुख्याधिकारी निखिल मोरे हे फलटण शहरात सर्वांच्या कौतुकाचा विषय बनले असून सामान्य नागरिकांच्या तक्रारीची सुद्धा ते त्वरित दखल घेत आहे शहरातील स्वच्छता व नागरिकांच्या समस्या बाबत ते जागरूकता दाखवीत असून अनेक वर्षानंतर फलटण नगरपालिकेला चांगला मुख्याधिकारी लाभला असल्याचे फलटण शहर शिवसेनाप्रमुख निलेश तेलखडे यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटणमध्ये येण्यापूर्वी शहराचे संपूर्ण रूप मुख्याधिकारी मोरे यांनी बदललेले आहे.फलटण नगरपालिकेतील विविध विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना बरोबरीने घेत त्यांनी पालखी सोहळा झाल्यानंतर केलेले स्वच्छतेचे काम अप्रतिम आहे. असे मत राजभाऊ देशमाने यांनी यावेळी व्यक्त केले.