स्थानिक

लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलमध्ये आधुनिक मशिनरीच्या माध्यमातून होणार डोळ्यांच्या विविध सर्जरी -डॉ. शेखर कोवळे

फलटण – लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल मध्ये आधुनिक मशिनरीच्या माध्यमातून डोळ्यांच्या विविध सर्जरी अल्पदरात होणार आहेत अशी माहिती प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. शेखर कोवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    लायन्स क्लब च्या माध्यमातून लायन्स मुधोजी धर्मादाय नेत्र रुग्णालयाची सुरुवात गेल्या ६० वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत रतनसीभाई पटेल, राजीव नाईक निंबाळकर, उल्हास भोईटे, भोजराज नाईक निंबाळकर, जगजीवन गरवालिया, अजित गांधी यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील अनेक गोरगरीब गरजू शेतकरी शेतमजूर यांच्या डोळ्यांची ऑपरेशन अल्प दरात व मोफत केली आहेत. 

मात्र हे करीत असताना रुग्णालयामध्ये मशीनरींची संख्या कमी पडत होती. व नेत्र रुग्णांची सर्जरी करत असताना अनेक अडचणी येत होत्या या अडचणीवर मात करण्याचे ठरवून मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे अध्यक्ष अर्जुन घाडगे, सचिव चंद्रकांत कदम, खजिनदार जगदीश करवा, व्हॉइस चेअरमन रतनसी पटेल, सुहास निकम,  मंगेश दोशी, रणजीत निंबाळकर, लायन राजीव नाईक निंबाळकर यांनी लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे अध्यायवत मशिनरी साठी एक कोटी 16 लाख 40 हजार 867 रुपयाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्या या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने मान्यता देऊन त्यांना हे अनुदान अध्यायावत मशिनरीसाठी उपलब्ध करून दिले. यामध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुधोजी आय हॉस्पिटल यांच्या वतीने 30 लाख रुपयाची भर घालून फरांदवाडी येथे स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुसज्ज व्हिजन सेंटर सर्व सोवि सुविधा युक्त असे नेत्र रुग्णालय उभा राहिले आहे ही निश्चितच आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन डॉ. शेखर कोवळे यांनी केले. 

याप्रसंगी मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे अध्यक्ष अर्जुन घाडगे, सचिव चंद्रकांत कदम, खजिनदार जगदीश करवा, जगजीवन गर्वालिया, भोजराज नाईक निंबाळकर, रणजीत निंबाळकर, सुहास निकम, मंगेश दोशी,प्रमोद निंबाळकर,महेश गरवालीया इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. कोवळे म्हणाले की, आता या नेत्र रुग्णालयामध्ये नेत्रपटल स्कॅन मशीन, नेत्रपट फोटो मशीन, डोळ्याची सोनोग्राफी मशीन, काचबिंदू निदान मशीन, स्लिट लॅम्प, ऑटो केरेटो रिफ्रॅक्टोमीटर, ॲपलनेशन टोनोमीटर, ए स्कॅन मशीन, लेन्स मीटर इत्यादी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगून कोवळे म्हणतात आज पर्यंत मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास तीन लाख 26 हजार 520 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामधून 51 हजार 500 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 37 हजार 500 इतक्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून 14000 शस्त्रक्रिया अल्पदान दरात करण्यात आल्या असल्याची माहिती देऊन डॉक्टर कोवळे म्हणतात भविष्यातही या रुग्णालयाच्या माध्यमातून येणाऱ्या नेत्र रुग्णांना अतिशय चांगल्या व सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार असून जनतेची सेवा हेच ब्रीद वाक्य घेऊन भविष्यातही हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेचा साठी सज्ज असेल अशी अपेक्षा बाळगतो असेही शेवटी शेखर कोवळे म्हणाले.

प्रास्ताविकात मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे अध्यक्ष अर्जुन घाडगे यांनी आजपर्यंतच्या नेत्र रुग्णालयाच्या प्रवासाची माहिती दिली यावेळी ते म्हणाले आंतरराष्ट्रीय संघटनेचे कोट्यावधी रुपयाचे अनुदान प्राप्त करून घेताना खऱ्या अर्थाने डॉक्टर शेखर कोवळे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शक झाले त्याचबरोबर या व्हिजन सेंटरचे नूतनीकरण मुंबई स्थित वास्तू विशारद सौ. झंकना कोवळे यांनीही विना मोबदला आम्हाला सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले तसेच हॉस्पिटल साठी लागणारी जागा जगदीश करवा यांनी विना मोबदला उपलब्ध करून दिली या सर्वांच्या मुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुदान आम्ही प्राप्त करून शकलो व या हॉस्पिटलची निर्मिती करू शकलो याबद्दल त्यांनी डॉक्टर शेखर कोवळे, जगदीश करवा यांचे मनापासून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button