पुणे: भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या कॅसाग्रँडने आज पुण्यातील त्यांच्या अप्पर खराडी येथील पहिला प्रकल्प असलेल्या कॅसाग्रँड कॅलेडियमच्या अनावरणाची घोषणा करण्यासाठी शहरात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पश्चिम भारतातील त्यांच्या ब्रँड अॅम्बेसेडर श्रीमती जिनिलिया आणि श्री. रितेश देशमुख, तसेच कॅसाग्रँडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण एमएन उपस्थित होते.
विश्वासार्हता, उत्तम कौटुंबिक मूल्ये आणि आकर्षण यासाठी ओळखले जाणारे हे दोघे विश्वास, गुणवत्ता आणि आनंददायी गोष्टींवर आधारित घरेग्राहकांसाठी तयार करण्याच्या कॅसाग्रँडच्या नीतिमत्तेचे उत्तम प्रतिबिंब आहेत. श्रीमती जिनिलिया आणि श्री. रितेश देशमुख यांच्याशी ब्रँडचे संबंध शहरातील घर खरेदीदारांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दर्शवतात आणि त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात विकसित होत असलेल्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करणारी उच्च-गुणवत्तेची, आधुनिक, अतिरिक्त प्रशस्त, सर्वोत्तम किमतीची घरे देण्यासाठी वचनबद्ध राहतात. त्यांची सार्वजनिक स्तरावरील प्रतिमा आणि महाराष्ट्राशी खोलवर रुजलेले संबंध त्यांना आदर्श राजदूत बनवतात, कारण ब्रँड या प्रदेशातील घर खरेदीदारांशी अर्थपूर्ण भावनिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ब्रँडने त्यांच्यासह सर्वांगीण मार्केटिंग मोहिमेची योजना आखली आहे. त्यातून कॅसाग्रँड कॅलेडियमच्या यूएसपीला अधोरेखित केले जाईल.
या कार्यक्रमात बोलताना कॅसाग्रँडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण एमएन म्हणाले, “आम्ही २००३ मध्ये इच्छुक घर खरेदीदारांना सर्वोत्तम किमतीत उत्कृष्ट उत्पादने देण्याच्या उद्देशाने आमचा प्रवास सुरू केला होता. गेल्या काही वर्षांत, आम्ही वेगाने विकास केला आहे परंतु आमचे ध्येय तेच राहिले आहे. आम्ही प्रवेश केलेल्या प्रत्येक बाजारपेठेत आम्ही विचारपूर्वक तयार केलेली सर्वोत्तम किमतीची घरे आणली आहेत आणि ती राहणीमानाचा अनुभव उंचावतात. आमची अनोखी रचना, उच्च दर्जाची, आधुनिक सुविधा आणि वैशिष्ट्ये, ग्राहककेंद्रित दृष्टिकोन यामुळे आम्हाला शहरातील घर खरेदीदारांमध्ये एक दृढ विश्वासार्हता निर्माण करण्यास मदत झाली आहे. आज आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा दिवस आहे कारण आम्ही पश्चिम भारतात पाऊल ठेवत आहोत, पुण्यात आमचा पहिला प्रकल्प, कॅसाग्रँड कॅलेडियम सुरू करत आहोत. हा पुण्याच्या बाजारपेठेसाठी अतिशय विचारपूर्वक डिझाइन केलेला, विशेषतः तयार केलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला श्रीमती जेनेलिया आणि श्री. रितेश देशमुख यांच्यासोबत कामकरताना खूप आनंद होत आहे, कारण ते विश्वास, सापेक्षता, मजबूत मूल्ये आणि खोलवर रुजलेले नाते आणतात. त्यावर आम्ही दृढ विश्वास ठेवतो. आम्हाला खात्री आहे की, त्यांच्याशी आमच्या सहकार्याने आम्ही शहरी क्षेत्राचे नवीन मानक स्थापित करून शहरात महत्त्वाची कामगिरी करू शकू.”
याबाबत पुढे बोलताना श्रीमती जिनिलिया आणि श्री. रितेश देशमुख म्हणाले, “पश्चिम भारतातील कॅसाग्रँडच्या प्रवासाचा भाग होण्यास आम्हाला खरोखरंच आनंद होत असून घरे बांधण्याइतकेच विश्वास निर्माण करण्यावर काम करणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्व करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमच्यासाठी घर नेहमीच फक्त एक जागा नसून बरेच काही आहे. ते असे ठिकाण आहे जिथे प्रेम वाढते, स्वप्ने आकार घेतात आणि प्रत्येक कोपरा एक कथा सांगतो. कॅसाग्रँडचा अनुभव घेताना आम्हाला नेमके हेच वाटले. त्यांनी तपशीलांकडे बरेच लक्ष दिले असून त्यांना कुटुंबांच्या राहणीमानाच्या गरजांची सखोल समज आहे. तसेच केवळ घरेच नव्हे तर त्याहूनही अधिक प्रगत, अद्वितीय निवास बांधण्याची त्यांची वचनबद्धता, यामुळे आम्हाला खरोखरंच प्रेरणा मिळाली. पुण्यातील बाजारपेठ समजून घेण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आणि त्यानुसार कॅसाग्रँड कॅलॅडियम डिझाइन केले हे पाहून आम्हाला आनंद होतो. आत्मविश्वासाने आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की, पुण्याला या प्रकल्पाकडून बरीच अपेक्षा करता येईल.”
पुण्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उपनगरातील – अप्पर खराडी येथे स्थित कॅसाग्रँडचा पहिला प्रकल्प, कॅसाग्रँड कॅलाडियम १.०५ कोटी रुपयांपासून सुरू होणारे अतिरिक्त प्रशस्त ३३४ इतके २ बीएचके आणि ३ बीएचके अपार्टमेंट देतो. या मालमत्तेत ११०+ जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. त्यात १३५०० चौरस फूट भव्य क्लबहाऊस, १८०० चौरस फूट रूफटॉप इन्फिनिटी पूल, ऑक्सिजन-इन्फ्युज्ड जिम, स्काय सिनेमा, थीम्ड गार्डन्स, मिनी थिएटर आणि बरेच काही समाविष्ट आहे. या मालमत्तेची रचना २ एकरच्या खुल्या जागेसह केली आहे. सिंगापूर-शैलीतील काचेचे दर्शनी भाग, २ एकरची खुली जागा आणि इतर अनेक अद्वितीय वैशिष्ट्यांसह कॅसाग्रँड कॅलाडियम पुण्यातील समग्र, भविष्यासाठी तयार शहरी राहणीमानासाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करते. ही मालमत्ता महाराष्ट्र रेरा – रेरा क्रमांक – पी५२१०००८०३०२ अंतर्गत नोंदणीकृत आहे.
चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोइम्बतूरमध्ये सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आणि १६०+ पेक्षा जास्त पूर्ण झालेले प्रकल्प, ५३+ दशलक्ष चौरस फूट निवासस्थाने आणि ५५,०००+ ग्राहकांसह कॅसाग्रँडने त्याच्या उच्च दर्जाच्या प्रशस्त घरे, आधुनिक सुविधा, ताबा मिळाल्यानंतरचे आधार आणि नाविन्यपूर्ण डिझाइन आणि इतर अनेक गोष्टींसाठी एक उत्तम प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
पुण्याच्या विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट इकोसिस्टममध्ये कॅसाग्रँड गुंतवणूक करत असताना ब्रँडने शहरातील घर खरेदीदारांच्या अद्वितीय पसंती पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ऑफरिंग्जमध्ये बदल करून त्यांच्या दृढ यशाच्या सूत्राची पुनरावृत्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरासाठी दीर्घकालीन दृष्टिकोनासह, कॅसाग्रँड डिझाइन उत्कृष्टतेला जीवनशैलीच्या सोयीशी जोडणारे, शहरी राहणीमानासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करणारे आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह व प्रगतीशील रिअल इस्टेट ब्रँडपैकी एक म्हणून त्यांचे स्थान पुन्हा मजबूत करणारे प्रकल्प देण्यासाठी वचनबद्ध आहे.
कॅसाग्रँड बद्दल – कॅसाग्रँड २००३ मध्ये स्थापित ही चेन्नईमधील एक आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. आम्ही अपार्टमेंटपासून ते स्वतंत्र व्हिलापर्यंत विविध प्रकारच्या मालमत्ता ऑफर करतो, सर्व जीवनशैली सुविधांनी सुसज्ज. आमचे प्रकल्प विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी लक्झरी, मध्यम श्रेणीची आणि परवडणरी श्रेणी समाविष्ट करतात. चेन्नईच्या पलीकडे जाऊन आम्ही बेंगळुरू, हैदराबाद आणि कोइम्बतूर सारख्या इतर प्रमुख शहरांमध्ये विस्तार केला आहे. आम्ही पुण्यात विस्तार करण्याची योजना आखत आहोत. आमची आंतरराष्ट्रीय विक्री दुबईतील आमच्या कार्यालयाद्वारे चालवली जाते. आम्ही वचनबद्ध पूर्णत्वाच्या वेळेसह दर्जेदार घरे देण्यावर लक्ष केंद्रित करतो. गेल्या दोन दशकांमध्ये संशोधन आणि सुलभ राहणीमान अनुभव देण्यावर आमचा भर ग्राहकांच्या समाधानाची खात्री देतो. आम्ही व्यावसायिक रिअल इस्टेट आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये देखील उपक्रम सुरू केले आहेत. २० वर्षांहून अधिक उत्कृष्टता, १६०+ प्रकल्प, ५३+ दशलक्ष चौरस फूट राहण्याची जागा आणि ५५,०००+ ग्राहकांसह, कॅसाग्रँड प्रेरणा देणारी घरे बांधण्यासाठी समर्पित आहे.