फलटण – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चौधरवाडी हायस्कूल चौधरवाडी(ता.फलटण)च्या शालेय विद्यार्थ्यांनी मुंबई येथे विधानभवनात जाऊन कामकाजाचे अवलोकन केले.आ.सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांची आवर्जून भेट घेतली आणिं त्यांच्याशी गप्पा मारल्या.
माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक निंबाळकर यांनीं स्थापन केलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चौधरवाडी हायस्कूल चौधरवाडी , च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल विधानभवन मुंबई येथे भेट देण्यासाठी गेली त्यांना संसदीय कामकाजा बद्दल अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले . या शालेय विद्यार्थ्यांची भेट घेऊन आ .सचिन पाटील यांनी कामगाची माहिती दिली.मुलांशी गप्पा मारल्या.या अनोख्या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता.
यावेळी सरपंच तुकाराम कोकाटे , सागर कदम, सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.