स्थानिक

२०२५ चा वक्फ सुधार कायदा : फायदे आणि तोटे – पुस्तकाचे प्रकाशन ;हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल सांगतेः मुफ्ती मंझूर ज़ियाई

पुणे .. इल्म व हुनर फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती मंझूर ज़ियाई यांच्या नेतृत्वाखाली “वक्फः शरीयत आणि सुधारणा” यासंदर्भातील एक अत्यंत उपयुक्त पुस्तक “वक्फ सुधार कायदा २०२५ः फायदे आणि तोटे” या शीर्षकाने नाशिक येथे प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशन समारंभास मुफ्ती अलाउद्दीन रज़वी (शहर काझी, ठाणे जिल्हा), मौलाना अखलाक निजामी (जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड, मुंबई) आणि नाशिकमधील अनेक प्रमुख राजकीय, सामाजिक व धार्मिक व्यक्तिमत्वांनी उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी या पुस्तकाचे सर्वसामान्यांसाठी महत्त्व पटवून देत हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

मुफ्ती मंझूर ज़ियाई यांनी पुस्तक प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी देशवासीयांना आवाहन करतो की हे पुस्तक नक्की वाचा, समजा आणि यातील तथ्य जाणून घ्या. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल सांगते, तुमच्या वक्फ संपत्तीबद्दल माहिती देते. देशभरात तुमची संपत्ती अस्तित्वात आहे पण त्यावर इतरांचा ताबा आहे.”ते पुढे म्हणाले की, “या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला अनेक महत्त्वाचे तथ्य समजतील आणि हेही कळेल की आपल्या पूर्वजांनी गरीब व गरजूंसाठी जी संपत्ती वक्फ केली होती, ती आज कुणाच्या ताब्यात आहे.

“Mufti Manzur Ziyaee Chief Mufti of Mumbai, Maharshtra, India B-SOL Gaurav Residency, Phase 1. Devarty Park Mira Road East-40110, Thane, Mumbai INDIA Mobile: +9004115786911-919004225786

Email: muftiziyaee@gmail.com

वक्फ सुधार कायदा २०२५ बद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “हा कायदा किती फायदेशीर आहे आणि किती तोट्याचा आहे हे समजून घ्या. जे फायदेशीर आहे ते स्वीकारा आणि जे हानिकारक आहे त्याविरोधात न्यायालयात जा.”

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की या पुस्तकाचे काय फायदे आहेत, तेव्हा त्यांनी सांगितले की, “या पुस्तकात आम्ही स्पष्ट केले आहे की तुमचे हक्क काय आहेत आणि तुमच्या पूर्वजांनी आपली मेहनतीची कमाई आपल्या मुलांना न देता समाजासाठी वक्फ केली होती जेणेकरून समाजाचे भवितव्य सुधारू शकेल.”

ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही हे पुस्तक वाचले नाही, तर तुमच्या मुलांना शाळा मिळणार नाहीत, रुग्णालये मिळणार नाहीत – जसे आजपर्यंत तुम्ही या सुविधांपासून वंचित आहात. म्हणूनच या सर्व गोष्टी जाणून घेणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्यावर आरोप करणारे लोक आरोप करत राहतील, पण जे लोक आमच्या वेदना समजून घेतील आणि पुस्तक वाचतील, त्यांना सत्य कळेल आणि ते अशा प्रकारचे आरोप करणार नाहीत.”

यावेळी मुफ्ती मंझूर ज़ियाई यांनी सांगितले की, “आमचा उद्देश हा आहे की हे पुस्तक शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. म्हणूनच आम्ही ३,००० प्रती वक्फ केल्या आहेत म्हणजेच हे पुस्तक मोफत वितरित केले जाईल जेणेकरून लोक ते वाचून सत्य समजू शकतील.” हे पुस्तक ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी मुंबईत या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्यानंतर मुफ्ती मंझूर ज़ियाई यांच्या नेतृत्वाखाली हे पथक नाशिकमध्ये दाखल झाले जिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आता हे पथक जळगाव आणि पुणे येथे जाणार असून, तेथेही या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button