पुणे: अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथील बालरोगतज्ञ आणि पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) आणि आपत्कालीन सेवेचे प्रमुख डॉ. मिलिंद जंबगी यांची वर्ल्ड फेडरेशन ऑफ पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह अँड क्रिटिकल केअर सोसायटीज (WFPICCS) ,ओंटारियो येथील शिक्षण समितीचे जागतिक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, जी भारतीयांकरिता एक अभिमानास्पद बाब आहे.
बालरोग क्रिटिकल केअर विभागातंर्गत गंभीर आजारांनी पिडीत मुलांवर यशस्वी उपचार केले जातात. ज्यांना सतत देखरेख आणि प्रगत वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असते. ज्यांना अवयव प्रत्यारोपणची आवश्यकता आहे किंवा गंभीर संसर्ग, श्वसनक्रियेसंबंधी समस्या, आघात, डायलिसिस, जन्मजात विकार किंवा शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतरची काळजी यासारख्या जीवघेण्या परिस्थितींचा सामना करावा लागत आहे अशा मुलांसाठी हे विभाग महत्त्वाची भूमिका बजाविते. WFPICCS ही जगातील सर्व बाल आरोग्य व बाल अतिदक्षता वैद्यक शास्त्र क्षेत्रातील राष्ट्रीय संस्थांची जागतिक शिखर संघटना आहे.
वर्षानुवर्षे समाजासाठी कार्यरत असलेल्या डॉ. मिलिंद जंबगी यांना जागतिक दर्जावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून हा एक सन्माननीय बाब आहे. बालरोग अतिदक्षता हा केवळ एक विशेष विभाग नसून ते गंभीररित्या आजारी बालरुग्णांसाठी जगण्याची आशा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि आता जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली असून त्याचा मला अभिमान आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला जगण्याची आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिन. जीवघेण्या परिस्थितीचा सामना करणारे अर्भकं, लहान बाळं आणि किशोरवयीन मुलांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हे माझे मुख्य ध्येय्य आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणे, संशोधनात प्रगती करणे आणि बालरोग अतिदक्षता तज्ञ आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली निश्चित करण्यास प्रमुख प्राधान्य दिले जावे. गरजू बालरुग्णापर्यंत आवश्यक आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया डॉ. मिलिंद जंबगी, पीआयसीयू आणि आपत्कालीन सेवांचे प्रमुख आणि बालरोगतज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी व्यक्त केली.पुढे सांगतात की, प्रत्येक मूल, मग ते कुठेही जन्माला आले असले तरी त्याला जगण्याची सर्वोत्तम संधी मिळावी असे मला वाटते.