स्थानिक

डॉ सागर माने IHW कौन्सिल तर्फे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (ISAR) आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटी (IFS) यांच्यावतीने रीजनल लीडरशिप इन फर्टिलिटी अ‍ॅडव्हान्समेंट अवॉर्ड” या पुरस्काराने सन्मानित

फलटण – फलटण येथील सुप्रसिद्ध राधाकृष्ण हॉस्पिटल आणि IVF सेंटरचे प्रमुख डॉ सागर माने यांना IHW कौन्सिल तर्फे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (ISAR) आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटी (IFS) यांच्यावतीने रीजनल लीडरशिप इन फर्टिलिटी अ‍ॅडव्हान्समेंट अवॉर्ड” या पुरस्काराने  नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

वर्ल्ड आयव्हीएफ डे (२५ जुलै २०२५) या निमित्ताने मला “रीजनल लीडरशिप इन फर्टिलिटी अ‍ॅडव्हान्समेंट अवॉर्ड” या पुरस्काराने डॉ  सागर माने यांना सन्मानित करण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या  माजी संयुक्त सचिव श्रीमती सुजया कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार समारंभ ६ वा इंडिया आयव्हीएफ समिट व अवॉर्ड्स दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडला. या सोहळ्यात डॉ. अमित पाटकी (अध्यक्ष, ISAR) आणि डॉ. पंकज तलवार (अध्यक्ष, IFS) हेही उपस्थित होते.

हा राष्ट्रीय पुरस्कार IHW कौन्सिल तर्फे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (ISAR) आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटी (IFS) यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. हे दोन्ही संघटन देशातील अग्रगण्य आयव्हीएफ तज्ञांचे राष्ट्रीय संघटन आहेत. यावेळी बोलताना डॉ सागर माने यांनी हा पुरस्कार माझ्या प्रामाणिक, निष्ठावंत आणि उत्कटतेने केलेल्या कार्याची व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची दखल आहे. हा सन्मान मी माझ्या रुग्णांना आणि शुभचिंतकांना अर्पण करतो, ज्यांच्या विश्वासाने व पाठिंब्याने हे कार्य शक्य झाले.

या पुरस्काराबद्दल डॉ सागर माने यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button