फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी डोळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल व्हॅन चांगली संकल्पना असून गरजूंना त्याचा फायदा निश्चितच होईल असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला
पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते मोबाइल मेडिकल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आ सचिन पाटील,स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर,अमोल सस्ते आदी उपस्थित होते.
व्हॅनद्वारे वारीच्या मार्गावरील वारकऱ्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे.या उद्घाटन प्रसंगी महायुतीचे अनेक पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड सौ जिजामाला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वारी ही श्रद्धेची आणि सेवाभावाची परंपरा आहे. वारकऱ्यांचे आरोग्य हेच आमचे प्रमुख लक्ष असून, या मोबाइल मेडिकल व्हॅनद्वारे त्यांना गरज पडल्यास त्वरित औषधोपचार मिळू शकतील.”
ही व्हॅन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असून, प्राथमिक उपचारांसाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यामध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार, ताप, जखमा, डिहायड्रेशन, तसेच रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था यासाठीही ही व्हॅन सज्ज असल्याचे आ सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.