फलटण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संस्थेचा 66 वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून श्रीराम संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण तसेच सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण, नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय, फलटण सौ . वेणूताई डी फार्मसी कॉलेज, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन मोठ्या आनंदात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके उपस्थित होते. तसेच डायटचे अधिव्याख्याता फरांदे, बीआरसी समन्वयक सौ. कुंभार , चारही शाखांचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक आलेले गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दत्तक पालक योजना अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले.
Back to top button
