महाराष्ट्र

शिकलगार समाजातील विद्यार्थ्यांसाठी 28 जून रोजी पुणे येथे युपीएससी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन – नौशादभाई शिकलगार

   मुंबई – शिकलगार समाजातील विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी व्हावेत, याभावना आमच्या होत्या आता  या भावना सत्यात उतराव्यात यासाठी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून दिनांक  28 जून रोजी पुणे येथे राज्यातील शिकलगार समाजातील मुला मुलीसाठी एक दिवसाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले असल्याची माहिती शिकलगार संघटनेचे अध्यक्ष नौशादभाई शिकलगार यांनी दिली.

शिकलगार समाजातील विद्यार्थी अधिकारी व्हावेत. यासाठी संघटना आणि समाजाने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी दिनांक 28 जून रोजी आकुर्डी(पुणे) येथील वेदास फॅमिली रेस्टॉरंट(बजाज ऑटो शेजारी)मध्ये सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत मार्गदर्शन शिबिर होणार आहे.या शिबिराला मार्गी इन्स्टिट्यूटचे प्रवीण चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.
युपीएससी करु  इच्छुकांनी आमिर शिकलगार मोबाईल 8600285158 तसेच संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन नौशादभाई शिकलगार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button