फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत,भाविकांना पाणी,आरोग्य,निवारा या सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन आ.सचिन पाटील यांनी केले.

श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 च्या अनुषंगाने आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील अपूर्ण कामामुळे येणारे अडथळे दूरकरणेबाबत आढावा बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.सचिन पाटील यांच्या उपस्थित तहसिल कार्यालय फलटण येथे पार पडली.त्यावेळी आ.सचिन पाटील बोलत होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या आगमनापूर्वी पालखी मार्गावरील सर्व अपूर्ण कामे त्वरित व व्यवस्थित करून घ्यावीत, आरोग्याची सुविधा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध करून घ्यावी पिण्याच्या पाण्याचे नमुने वारंवार तपासावेत भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश आ.सचिन पाटील यांनी दिले.
या बैठकीस प्रांताधिकारी सौ प्रियांका आंबेकर एन.एच.ए.आएचे संजय कदम तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनावणे, गटविकास अधिकारी कुंभार , सार्वजनिक बांधकाम विभागाचे आंबेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे पोलीस अधिकारी सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
Back to top button
