फलटण -शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले यांच्या हस्ते ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार देऊन पोकळे वस्ती शाळेतील उपशिक्षक राजेंद्र कर्णे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्ञानांजनचे व्यवस्थापक केदार जोशी, समन्वयक सुभाष नाळे यांची उपस्थिती होती.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेचा पट वाढविण्याबरोबरच 2025 मध्ये घेण्यात आलेल्या ज्ञानांजन स्पर्धा परीक्षेत पोकळे वस्ती शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी राजेंद्र कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली उज्वल यश संपादन केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.