स्थानिक
पालखी मार्गाच्या दुरवस्थेची माजी खा.रणजितसिंह आणि आ.सचिन पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांसमवेत पायी पाहणी,रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
रक्षक रयतेचा न्यूजच्या सडेतोड वृत्ताची दखल,पालखी मार्ग होणार खड्डेमुक्त

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तोंडावर आला असताना सुद्धा फलटण शहरांमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था असून मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा निव्वळ फोटोसेशन दौरा झाला आहे. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी, स्वच्छतेसाठी प्रशासन टंगळमंगळ करत असल्याचे सडेतोड वृत्त आज रक्षक रयतेचा न्युजने प्रसिद्ध करताच माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ सचिन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण पालखी मार्गाची पायी चालत पाहणी करून रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना केल्या.
– श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तोंडावर आला असताना सुद्धा फलटण शहरातील रस्त्यांची कामे अपुरी असून अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पॅचवर्कचे काम निकृष्ट झाले आहेत. जी कामे सुरू आहेत त्यामुळे गैरसोय होत आहे.अनेक वाहन चालक हैराण झाले आहेत . पालखीचा मार्ग खडतर झाला आहे पालखी मार्गाची दुरावस्थेबाबत आज रक्षक रयतेचा न्यूजने सविस्तर वृत्त करून प्रशासनाला धारेवर धरले होते.
याबाबत प्रसिद्ध वृत्ताची तातडीने दखल घेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ सचिन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत जिंती नाका ते विमानतळ अशी पायी पाहणी केली रस्त्यावर त्यांना दिसणाऱ्या अडीअडचणीबाबत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोबत असणाऱ्या पत्रकारांच्याकडून पण सूचना जाणून घेतल्या यावेळी प्रांताधिकारी ,तहसीलदार,मुख्याधिकारी,उपविभागीय पोलिस अधिकारी ,शहर पोलिस निरीक्षक तसेच सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आतापर्यंत पालखी मार्गावर तात्पुरता मुरूम टाकून खड्डे बुजवले जात होते मात्र आमची सत्ता येताच आम्ही या पालखी मार्गासाठी विशेष निधी मंजूर करून पूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला काही कारणाने कामांना उशीर झाल्याने यावर्षी थोडी गैरसोय होणार असली तरी पालखी मार्गावर एक सुद्धा खड्डा दिसणार नाही पालखी मार्ग तातडीने सुरळीत करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेले आहेत पालखी मार्गाचा रस्ता पुढील 50 ते 100 वर्षे टिकेल या पद्धतीनेच याचे काम होणार आहे. फलटणचा पालखी मार्ग इतरांना आदर्श असेल असा बनविणार आहे.
आ.सचिन पाटील यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्याची कामे मार्गी लावावीत पालखी मार्गावरील कामे दर्जेदार झाली पाहिजेच पण फलटण शहरातील इतर भागातील सुद्धा कामे तातडीने चांगल्या पद्धतीने पूर्ण करावित रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावेत यावर्षी उशिरा पालखी मार्गाचे काम सुरू झाले असले तरी या ज्या मार्गावरून पालखी जाईल तेथे कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही असे नियोजन केले असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.सचिन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत पायी चालत शहरातील पालखी मार्गाची पाहणी केल्याने याच्या नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या आत्तापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी पालखी मार्गाची पायी चालत पाहणी केली नव्हती वरील दोघांनी केल्याने पालखी मार्ग चांगला होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.