फलटण – माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक,सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांनी जनहितार्थ संपर्क कार्यालय सुरू केले असून नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रमात आमिरभाई शेख अग्रेसर असतात अनेक लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असतात त्यामुळे त्यांनी संपर्क कार्यालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्याप्रमाणे त्यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे.नामजोशी पेट्रोल पंपच्या मागे, बारव बाग,रिंग रोड फलटण येथे माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. स्वतः आमीरभाई शेख हे कार्यालयात दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 4 ते 7 या वेळेत उपस्थित राहणार आहेत.या कार्यालयात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,मौलाना आझाद महामंडळ यांची कर्जप्रकरणे,विविध आरोग्य योजना, रेशनिंग कार्ड,आधार कार्ड, ई श्रम कार्ड,बांधकाम कामगार योजना,संजय गांधी योजना,आयुष्यमान कार्ड आदींचे मोफत फॉर्म भरून घेण्यात येणार आहे.विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहे.नागरिकांनी अधिक माहितीसाठी आमिरभाई शेख मोबा.- 8788945221,, 8806905786 संपर्क साधावा.