स्थानिक

फलटण तालुक्यात मे २०२५ मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले असल्याने बाधीत शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रु. अर्थिक मदत मिळावी – महेंद्र सूर्यवंशी बेडके यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी

फलटण – फलटण तालुक्यात मे २०२५ मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे अतोनात नुकसान झाले असल्याने बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात म्हणून हेक्टरी ५०,०००/- रुपये अर्थिक मदत मिळावी व पावसामुळे नागरिकांच्या राहत्या घराचेही नुकसान झालेले आहे त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) च्या वार्षिक अनुदानाच्या १०% पर्यंत निधी वापर करून राज्य शासनाच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी प्रत्यक्ष निवेदनाद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली

 अतिवृष्टी मुळे शेतातील माती,दगड वाहून गेल्या कारणाने बाधित शेतकऱ्यांना पुन्हा शेत जमीन तयार करण्यासाठी तलाव, धरण व इतर क्षेत्रातील गाळ, माती व दगड मोफत उपलब्ध करून देण्यात यावेतरहिवासी क्षेत्रातील अनेक घरे पडझड झालेली आहेत त्यांना पक्के बांधकाम करण्यासाठी भरीव अर्थिक मदत मिळावी कृषी खात्या मार्फत बी बियाणे मोफत वाटप करण्यात यावे व पीक अनुदान मिळावे. 

सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास तसेच शहर हद्दीतील नगरविकास विभागामार्फत तातडीने वाहून गेलेले रस्ते, पूल,साकव दुरुस्ती तसेच पुनर्निर्माण करण्यात यावे यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री  मकरंद  पाटील  यांचे कडे फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button