महाराष्ट्र

फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना निश्चितच भरपाई मिळेल ,अनेक बैठकामध्ये व्यस्त असल्याने फलटणमध्ये यायला वेळ लागला – ना. मकरंद पाटील

रक्षक रयतेचा न्यूजच्या बातमीची मंत्री महोदयांकडून दखल

फलटण- फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना निश्चितच भरपाई मिळेल अनेक बैठकामध्ये व्यस्त असल्याने फलटणमध्ये यायला वेळ लागला असला तरी आमदार सचिन पाटील यांच्या सतत संपर्कात मी होतो अशी माहिती मदत व पुनर्वसन म्हणतात मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होऊन प्रचंड नुकसान झाले होते जिल्ह्यात चार मंत्री असून सुद्धा ते फलटणला फिरकले नव्हते यामुळे “सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री” या मथळ्याखाली रक्षक रयतेचा न्यूजने वृत्त प्रसिद्ध केले होते आणि मंत्र्यांना धारेवर धरले होते या वृत्ताची दखल घेऊन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिनांक 31 मे रोजी फलटणचा अचानक दौरा केला यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रारंभीच त्यांनी उशिरा येण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

फलटण तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. सर्व पंचनाम्यांचा अहवाल शासनास प्राप्त होताच शासन निर्णयानुसार जी मदत शासन मान्य करेल ती मदत तातडीने संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.

   त्यांच्या समवेत आमदार सचिन पाटील, प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, डी के पवार, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

  ना. मकरंद पाटील पुढे म्हणाले मान्सूनपूर्व तयारीच्या मीटिंगा व अन्य कामामुळे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी येण्यास विलंब झाला.मात्र आ. सचिन पाटील यांच्या सतत संपर्कात होतो.अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळताच आयुक्त स्तरावरून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची सूचना मी स्वतः आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीही दिले होते. सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सध्या फिल्डवर पंचनामे करीत आहेत. 80 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. अद्यापही पंचनामे बाकी आहेत पंचनाम्यांची मुदत संपलेली नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

  अतिवृष्टी पावसाचा तडाका राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वत्र बसला आहे. फलटण तालुक्यात अभूतपूर्व पाऊस झाला. सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तालुक्यात अतिवृष्टीने घर, शेती, फळबागा, रस्ते, पुल यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे, घरांचे, तसेच ज्या घरात पावसाचे पाणी शिरले अशा घरांचेही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्ता,रस्ते,पुल, शाळा, अंगणवाड्या, बंधारे, जमिनी वाहून गेल्या, गुरंही मृत झालीत या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

   शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज असल्याचे पत्रकारांनी विचारताच ना. पाटील म्हणाले शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन वेगळी मदत करता येत नाही. निकषानुसार जी मदत देय असेल ती तातडीने संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन यापूर्वी अनेकदा मदत केली गेली आहे मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. सध्याच्या काळात पूर्वीपेक्षा शासन जास्तीत जास्त मदत देत आहे. हेही त्यांनी जाणीवपूर्वक निदर्शनास आणून दिले.

नामदार मकरंद पाटील यांनी सुरवडी, ठाकूरकी , पद्मावती देवी मंदिर जवळील पूल,संत हरिभाऊ मंदिराजवळील पूल, गणेश नगर ,जिंती नाका इत्यादी ठिकाणांची पाहणी केली

दरम्यान फलटण शहरातील रस्त्यांची डागडुजी पालखी पूर्वी पूर्ण केली जाईल. तसेच पालखी साठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे पुरवण्यासाठी शासनाचे सर्व विभाग सतर्क असतात त्या त्या विभागांची सर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत संबंधित विभागांना मंत्री स्तरावरून नियोजनाच्या सूचना दिल्या जातात असे त्यांनी सांगितले.

फलटण तालुक्यात झालेल्या प्रचंड नुकसानाची माहिती यावेळी आमदार सचिन पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील यांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button