फलटण : फलटण नगरपरिषदेचे अभिलेख अधिकारी मुश्ताक अहमद महात यांची भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे मार्फत द्वारका येथे आयोजित करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी / पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणासाठी फलटण विधानसभा मतदार संघातून निवड झाली असून दिनांक १२ व १३ जून २०२५ रोजी या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.
मुस्ताक महात यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालयाकडून त्यांची महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी राज्यसेवा स्वच्छता निरीक्षक संवर्गामध्ये स्वच्छता निरीक्षक या पदावर २०२४ मध्ये निवड करण्यात आलेली होती. नुकतेच दिनांक १ मे २०२५ रोजी कामगार दिनानिमित्त त्यांनी आजपर्यंत फलटण नगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श सेवा आदर्श कामगार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. कोरोनाच्या काळात फलटण नगरपालिकेच्या वतीने फलटण शहरात प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केले.काेराेना काळात अत्यंत कठीण परिस्थितीत मुश्ताक महात यांनी आपले परिवाराचा व स्वतः चा विचार न करता शहरवासीयांची काळजी घेत केलेली जनजागृती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ७५ वर्षे पुर्ण झाले निमीत्त फलटण शहरात हर घर तिरंगा हे अभियान उस्फुर्तपणे राबविले होते.