फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज फलटण वरून प्रस्थान होताच फलटण नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी फलटण नगर परिषद,कागल नगर परिषद व इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने अवघ्या काही मिनिटातच पालखी तळ स्वच्छतेला सुरुवात करून तीन तासात पालखी तळ स्वच्छ केला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण शहरात आल्यानंतर विमानतळ येथील पालखी तळावर मुक्कामास असतो जवळपास 100 एकरचा पालखीतळ असून लाखो वारकरी येथे मुक्कामासाठी असतात. काल रात्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात आगमन झाले. फलटण शहरातील विमानतळावरील मुक्काम आटोपून आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होताच अवघ्या काही मिनिटातच फलटण नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सहकारी कर्मचारी तसेच विविध संस्थांच्या मदतीने पालखी तळ स्वच्छतेला सुरुवात केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे राष्ट्रीय सेवा योजना यातील डॉ प्रताप फळफळे ,वंदना सोनवणे , प्राध्यापक योगिता घाटोळ ,डॉ सुरेखा जाधव, डॉ मनिषा बोडके, अशोक पिलाने, अनिल केंगर यांचे सोबत 150 विद्यार्थी तसेच कागल नगरपरिषद( जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांची 25 कर्मचारी यांची टीम यांनी फलटण पालखीतळ येथे स्वच्छतेची सेवा देण्याचे काम चालू केले. दुर्गंधी पसरू नये म्हणून ओडो फ्रेशची फवारणी ही केली आहे. नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा त्यांना सहकार्य करीत असल्याने अवघ्या तीन तासातच पालखीतळाची स्वच्छता झाल्याचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.
Back to top button
